शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरीप पिकाच्या मशागतीला आला वेग

By admin | Updated: June 15, 2014 23:37 IST

मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही वाढली आहे.

गोंदिया : मागील वर्षी अतिवृष्टीचा सामना करताना सर्वस्व गमावलेला बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही वाढली आहे. खरीप पिकाच्या मशातीची सर्वच कामे आता अंतिम टप्यात असून आता केवळ प्रतीक्षा पावसाची आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र, त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज असताना पाऊस मुसळधार स्वरूपात अविरत पडतच राहिला. जुलै, आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द कृषिमंत्र्यांनाही जिल्हाचा दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक शेतजमीन पार खरडून गेली आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्ये तलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना शेती करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे घेतले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतिवृृष्टीची नोंद शासन दरबारीही घेण्यात आली. मात्र, शासनाची मदत शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकले नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा दिला. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पीक उध्दवस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.
निसर्गाची ही अवकृपा विसरुन शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरीपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे जवळजवळ आटोपत आली आहेत. शेतातील कचरा स्वच्छ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेणखतही शेतात टाकले आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. यंदा कृषी विभागाने साडेचार लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. त्यापाठोपाठ सोयाबीन १ लाख ४० हजार हेक्टर व सर्वात कमी कापूस १ लाख १० हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. बहुतांश शेतकऱ्यांची खरीप पिकासाठी मशागतीची कामे आटोपली आहेत. त्यामुळे शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
यंदा वरूणराजा कृपा करेल की अवकृपाच दाखवेल, हे येणारी वेळच सांगेल. मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकरी फेडू शकले नाही. आता खरीप हंगाम पुन्हा तोंडावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)