शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसेच !

By admin | Updated: June 23, 2014 23:56 IST

जिल्ह्याचे माहिती अधिकारी कोण असा सवाल केल्यास माहिती असलेला व्यक्ती पटकन पल्लवी धारव यांचे नाव घेणार. मात्र त्यांच्या कार्यालयात जाऊन बघितल्यास माहिती फलकात आजही तत्कालीन

कार्यालयाचे फलक अपडेट नाही : धारव मॅडम रुजू होऊन तीन महिने झाले
गोंदिया : जिल्ह्याचे माहिती अधिकारी कोण असा सवाल केल्यास माहिती असलेला व्यक्ती पटकन पल्लवी धारव यांचे नाव घेणार. मात्र त्यांच्या कार्यालयात जाऊन बघितल्यास माहिती फलकात आजही तत्कालीन माहिती अधिकारी विवेक खडसे यांचेच नाव दिसून येते. धारव मॅडम यांना पदभार घेऊन तीन महिने होत असले तरी त्यांच्या कार्यालयातील माहिती फलक अद्याप अपडेट झालेले नाही. यामुळे जिल्ह्यातील अपडेटेड माहितीचे केंद्र असलेले माहिती कार्यालय स्वत:च अपडेट नसल्याचे यातून दिसून येते.
जिल्ह्यातील विविध शाखांची माहिती प्राप्त करावयाची असल्यास जिल्हा माहिती कार्यालय उपयुक्त स्थान आहे. सर्वसामान्यांना तर सोडाच मात्र वृत्तपत्रांना सुद्धा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून कित्येक माहिती पुरविली जाते. एवढेच नव्हे तर शासकीय कार्यालयातील बहुतांश माहितीचे व्यवहार सुद्धा माहिती कार्यालयाच्या माध्यमातूनच केले जातात. यावरून शासन व सर्वसामान्यांसह प्रामुख्याने वृत्तपत्रांमधील दुवा म्हणजे माहिती कार्यालय असे बोलणे वावगे ठरणार नाही.
यामुळे विविध विषयांची अपडेटेड माहिती ठेवणे माहिती कार्यालयाचे काम आहे. मात्र आपल्या कार्यालयातील अंतर्गत विषयांना घेऊनच येथील माहिती कार्यालय अपडेट नसल्याचे दिसून येते. त्याचे असे की, एखादा नवखा कार्यालयात गेल्यास व तेथे लागलेले फलक बघितल्यास त्याला माहिती अधिकारी विवेक खडसेच असल्याची माहिती मिळणार. कारण, कार्यालयात लागलेल्या माहिती फलकात आजही माहिती अधिकारी म्हणून विवेक खडसे यांच्या नावाची नोंद असून त्यांनी पदभार घेतलेल्या तारखीची नोंद आहे.
वास्तवीक मात्र खडसे यांचे स्थानांतरण होऊन आता वर्ष होत आहे. त्यांच्या नंतर मनिषा सावळे यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचा प्रभार देण्यात आला होता. आजघडीला पल्लवी धारव या माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
धारव मॅडम मार्च मध्ये रुजू झाल्या असून आता तीन महिने होत असली तरी त्यांनीही हे फलक अपडेट करवून घेतले नाही. वास्तवीक हे त्यांचे काम नाही मात्र संबंधीत कर्मचाऱ्याने तरी हे काम करवून घेणे अपेक्षीत आहे. मात्र तसे न झाल्याने माहिती फलकानुसार जिल्हा माहिती अधिकारी खडसेच आहेत.
(शहर प्रतिनिधी)