शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा झाला बालकामगार मुक्त ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

गोंदिया जिल्ह्यात चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल व कपडे यासारख्या वस्तूंच्या दुकानात आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही अत्यंत अनिष्ट प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. बालकामगार प्रथा हा समाजाला लागलेला कलंक असून याला दूर करु न बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे.

ठळक मुद्दे५६६ प्रतिष्ठानांना भेटी : चार वर्षांपासून एकही बालकामगार मिळाला नाही

नरेश येटरे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणा : शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी शासनाने प्रगत शैक्षणीक महाराष्ट्राची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केली. गरीब मुलांना गरिबीमुळे काम केल्याशिवाय पर्याय उरत नसल्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते. त्यांनाही शाळेत जाता यावे म्हणून बाल संक्रमण शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १६ बाल संक्रमण शाळा सद्यस्थितीत बंद झाल्या आहेत. एकही बालमजूर मागील ४ वर्षांपासून कामगार आयुक्तालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळला नाही. म्हणजेच, गोंदिया जिल्हा बालकामगारमुक्त झाला की बालकामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही असा सवाल उपस्थित होत आहे.गोंदिया जिल्ह्यात चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा दुकान, चप्पल व कपडे यासारख्या वस्तूंच्या दुकानात आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करावयास लावणे ही अत्यंत अनिष्ट प्रथा आहे. त्यामुळे या बालकांचे बालपण तर हिरावले जातेच शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. बालकामगार प्रथा हा समाजाला लागलेला कलंक असून याला दूर करु न बालकामगारांचे शिक्षण करणे ही सामाजिक गरज बनली आहे. गरिबीमुळे न शिकणारी मुले-मुली कामधंदा करून अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग व व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.बालकामगार निर्माण होण्यास आई-वडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असते. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आदी पारंपारीक व्यवसाय करतात. जनावरांच्या मदतीने माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा, भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. ज्या उद्योग व व्यवसायांमध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करु न त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यांची पिळवणूक थांबवून हरविलेले बालपण त्यांना मिळवून दिले पाहिजे.यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. बालकामगार व त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगार विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे. त्यांना शासनाकडून शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. धोकादायक उद्योग व व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांचे सर्वेक्षण डिसेंबर महिन्यात करण्यात आले. परंतु एकही कामगार मिळाला नाही असे सांगण्यात आले.चार वर्षात तपासली ५६६ दुकानेजिल्ह्यात कुठेही बालकामगार काम तर करीत नाही यासाठी बालकामगार आयुक्त कार्यालयाने सन २०१६ पासून डिसेंबर २०१९ या ४ वर्षात जिल्ह्यातील ५६६ दुकाने तपासली. कोणत्याही दुकानावर बालकामागर आढळला नाही असे सह आयुक्त कामगार कार्यालय सांगते. सन २०१६ मध्ये ९० प्रतिष्ठान, सन २०१७ मध्ये २८०, सन २०१८ मध्ये ८२, सन २०१९ मध्ये मार्च महिन्यात २७, जून महिन्यात २२, जुलै महिन्यात ३३ व नोव्हेंबर महिन्यात ३२ अशी एकूण ११४ प्रतिष्ठाने तपासण्यात आली. अशाप्रकारे मागील ४ वर्षात ५६६ प्रतिष्ठाने तपासण्यात आली. परंतु जिल्ह्यात एकही बालमजूर मिळाला नाही.सर्वेक्षणात आढळली ‘ती’ कोणती बालकेडिसेंबर महिन्यात बालकामगार शोध मोहीम राबविण्यात आली. यात काही बालके आढळली. परंतु ही बालके कामगार नाहीत असे सहायक आयुक्त कार्यालयाचे म्हणणे आहे. मिळालेली बालके कोणती आहेत ती नियमित शाळेत दाखल होती काय, शाळा बाह्य आहेत काय, याचीही पाहणी केली जाणार आहे. मागील ४ वर्षात एकही बालकामगार न आढळल्याने जिल्ह्यात सर्वच व्यापारी, कारखानदार, विटभट्टी मालक बाल कामगार निर्मुलन संकल्पना राबवित आहेत काय असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे.