शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई

By admin | Updated: April 18, 2017 01:07 IST

मागील एका वर्षात काम व्यवस्थित नसणाऱ्या जिल्ह्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

बेरोजगार संस्था सर्वाधिक : सहकार विभागाची कारवाई गोंदिया : मागील एका वर्षात काम व्यवस्थित नसणाऱ्या जिल्ह्यातील ४७ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. आता या संस्थांना बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. यापूर्वीही सहकार आयुक्तांच्या आदेशावरून कित्येक संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.मागील वर्षी ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यात १०१० सहकारी संस्था सुरू होत्या. एक वर्षात यातील ४७ संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता ९६३ सहकारी संस्था उरल्या आहेत. या संस्थांमधील काहींजवळ योग्य ते कागदपत्र नसल्याचेही दिसून आले आहे. तसेच नोंदविण्यात आलेल्या पत्यावर संस्थाच नसल्याचेही दिसून आले आहे. एकंदर यातून संस्था बनावट असल्याचे स्पष्ट होते. यामुळेच अशा या संस्थांवर कारवाई करण्यात आल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अवसायनात काढण्यात आलेल्या संस्थांमध्ये सर्वाधीकबेरोजगारांच्या संस्था आहेत. पूर्वी राज्य शासनाकडून नोंदणीकृत बेरोजगारांना भत्ता दिला जात होता. मात्र भत्ता बंद करून बेरोजगारांच्या संस्था निर्माण करण्याची सुरूवात राज्य शासनाने केली होती. जिल्ह्यात सुमारे ३६० बेरोजगार संस्थांची नोंदणी करण्यात आली होती. नियमानुसार या संस्थांना तीन वर्षे अनुदान द्यावयाचे होते. मात्र पहिल्या वर्षी सुमारे ४४ लाख रूपयांचे अनुदान देण्यात आल्यानंतर अनुदान देणे बंद करण्यात आले. या संस्थांना कंत्राटसुद्धा द्यावयाचे होते. मात्र अनेक संस्थांचे संचालक यासाठी तयार नव्हते. कारण अशा या संस्थांची निर्मिती केवळ अनुदानासाठी करण्यात आली होती. अशात अनुदान बंद झाल्याने संस्था फक्त कागदावर होत्या. (शहर प्रतिनिधी)या संस्था निघाल्या अवसायनातज्या संस्थांवर अवसायनाची कारवाई करण्यात आली आहे त्यात पाच औद्योगिक सहकारी संस्था, एक जंगल कामगार संस्था, दोन उपसा जलसिंचन संस्था, ३० बेरोजगार संस्था, पाच ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, एक गृहतारण संस्था, एक कर्मचारी पतसंस्था, एक अन्य प्रक्रिया संस्था तर एक पाणी वापर संस्था आहे.