शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ढोलक बनले त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन

By admin | Updated: April 20, 2015 01:02 IST

ढोलकीवर थाप पडताच भल्याभल्यांचे पाय आपसूकच थिरकू लागतात.

देवानंद शहारे गोंदियाढोलकीवर थाप पडताच भल्याभल्यांचे पाय आपसूकच थिरकू लागतात. नवनवीन वाद्य विकसीत होत चालले तरिही ढोलकीच्या तालावर नाचण्याचा आनंद काही औरच आहे. हेच कारण आहे की, आजच्या युगातले नवनवे वाद्य जुन्या वाद्यांची सर करीत नाही. म्हणूणच जबलपूर येथील रहिवासी खान मोहम्मद यांचा ढोल तयार करण्याचा वडिलोपार्जीत व्यवसाय आजही सुरूच असून ढोलकचं त्यांच्या उदरनिर्वाहाने साधन बनले आहे. कुटूंबात पत्नी व तीन मुले असलेले पस्तीशीच्या वयातील खान मध्यप्रदेशासह महाराष्ट्र व छत्तीसगढ या प्रांतात जावून जबलपूर येथे स्वत:च्या घरी तयार केलेले ढोलक विक्री करतात. कमीत कमी लहान-मोठे १२ ढोलक घेवून ते घरून निघतात. एकटेच मोठमोठ्या शहरात कमीत कमी तीन ते चार दिवस राहून ढोलक विक्री करून स्वगावी परततात. पुन्हा ढोलक तयार करून त्यांच्या विक्रीसाठी ते मोठ्या शहरात जातात हाच त्यांचा नित्यक्रम आहे.सध्या खान मोहम्मद गोंदियात मुक्कामी असून दोन ढोलक विकल्यानंतर त्यांची बालाघाट येथे जाण्याची तयारी आहे. कमीत कमी दोन दिवस एका शहरात रहायचे व ढोलक विक्री करायचे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुन्हा विक्रीसाठी त्या शहरात जायचे. ज्या शहरात ढोलक विक्रीला प्रतिसाद मिळत नाही, तिथे पुन्हा जात नसल्याचे खान यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात ढोलक विक्री अधिक होत असून गणपती उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिला वर्गही न शिकलेले खान अशिक्षीत असल्याची खंत व्यक्त करतात. ‘पढे लिखे होते तो धंदा बदल जाता’ असे सांगत मी अशिक्षित असलो तरी आपल्या पाल्यांना अशिक्षित ठेवणार नाही, हे त्यांचे शब्द मात्र प्रेरणा देणारे वाटत आहेत.