परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:47+5:30

पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.

In-depth inquiries of return from other state | परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

Next
ठळक मुद्देअनिल देशमुख : कोरोना स्थितीबाबत घेतला आढावा, आरोग्य व पोलीस विभागाला दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांची सखोल चौकशी करा. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, यासाठी आरोग्य आणि पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि.३) येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी (दि.३) जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते बोलत होते. बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.
अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडताना सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. नाक व तोंडाला मास्क लावावा. विषाणू नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून क्षयरुग्ण व उच्च रक्तदाब रुग्णांची आणि गर्भवती महिलांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ.बलकवडे यांनी या वेळी दिली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांची उपस्थिती होती.

४४ हजार नागरिक परराज्य आणि जिल्ह्यातून दाखल
बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना क्रि याशील रुग्ण आहे. २३ कंटेन्मेंट झोन असून यामध्ये शहरी भागात तीन आणि ग्रामीण भागात वीस कंटेन्मेंट झोनचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४८ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. संस्थात्मक अलगीकरणात ३२०५ तर गृह अलगीकरणात २७०७ व्यक्ती आहेत. जिल्ह्यात १२ कोविड केअर सेंटर असून त्याची खाटांची क्षमता १२८६ इतकी आहे. सद्यस्थितीत या सेंटरमध्ये ३३७ व्यक्ती उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.

Web Title: In-depth inquiries of return from other state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.