शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: October 14, 2015 02:38 IST

जंगलात गुरे चारण्यासाठी पैसे देऊनही पावती फाडली नाही. दरम्यान वाघाने गाय खाल्ली,...

श्वापदांचा धुमाकूळ : शेतकऱ्यांचे तहसीलदार, वनाधिकाऱ्यांना निवेदनअर्जुनी-मोरगाव : जंगलात गुरे चारण्यासाठी पैसे देऊनही पावती फाडली नाही. दरम्यान वाघाने गाय खाल्ली, मात्र पावती नसल्यामुळे शासकीय मोबदल्यापासून वंचित झाल्याचा आरोप देऊळगाव-बोदरा येथील भास्कर तुळशीराम सूर्यवंशी यांनी केला आहे. रोपवाटिका व कूप सोडून इतर जंगलात गुरेढोरे चारण्याची तरतूद आहे. यासाठी वनविभागातर्फे शुल्क आकारणी केली जाते. सूर्यवंशी यांनी दोन महिन्यापूर्वी बोदरा-देऊळगाव येथील वनरक्षक डोंगरे यांच्याकडे वारंवार पावतीची मागणी करीत होते. मात्र वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी सूर्यवंशी हे जंगलात गुरे चराईसाठी गेले असताना वन्यप्राण्याने गाय फस्त केली. वन्यप्राण्यांनी गुराढोरांची हत्या केल्यास शासनातर्फे शासकीय मोबदला दिला जातो. परंतु यासाठी शुल्क भरल्याची पावती असणे आवश्यक असते. पावती नसल्यामुळे सूर्यवंशी या मोबदल्यापासून वंचित झाले आहेत. सूर्यवंशी यांनी स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)