शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेत प्रशासनाची उदासीन भूमिका

By admin | Updated: February 26, 2015 00:59 IST

राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याचे स्त्रोत विकसित करण्याचा निर्णय घेतला.

गोंदिया : राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवून पाण्याचे स्त्रोत विकसित करण्याचा निर्णय घेतला. पण या अभियानाच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा प्रशासनाची भूमिका उदासीन असल्यामुळे कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही हे अभियान राबविण्याच्या बाबतीत औदासिन्य येत आहे.जलयुक्त अभियानात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. या अभियानातून कोणत्या गावात काय करता येईल, याची माहिती सर्व विभागांकडून मागविण्यात आली. जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य सचिव असलेल्या जिल्हास्तरीय समितीने त्या माहितीच्या आधारावर कोणत्या तालुक्यात कोणती कामे करायची याचे नियोजन केले. त्यानुसार निधीही दिला जात आहे. दि.१९ ला तिरोडा तालुक्यातील घोगरा ग्रामपंचायतअंतर्गत पाटीलटोला येथील मामा तलावावर या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्यासह या अभियान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, गटविकास अधिकारी जमईवार, तहसीलदार, कृषी अधिकारी आदी सर्व छोटेमोठे अधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनीच दांडी मारली. या कार्यक्रमाला हजर राहण्याऐवजी ते कुटुंबियांसोबत नागपूर येथे फिरायला गेले असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक त्या दिवशी शासकीय सुटी असली तरी इतर सर्व अधिकारी या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ असल्यामुळे तिरोडा येथील कार्यक्रमाला आवर्जुन हजर होते. त्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही यावेळी हिरमोड झाला. एवढेच नाही तर आमदार रहांगडाले यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने वेळीच कारभार सुधारण्याची मागणी आहें. (जिल्हा प्रतिनिधी)