शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

साखरीटोला परिसरातील गावात डेंग्यूचा कहर

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्युने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्युने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला गावाला लागून असलेल्या आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावे डेंग्युच्या विळख्यात सापडली आहेत.
यात तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या वडद, सोनेखारी, कवडी, कन्हारटोला, रामपूर, अंजोरा गावात डेंग्युचे बरेच रुग्ण आढळले. तर सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सलंगटोला, चर्जेटोला येथे डेंगुचे रुग्ण आढळल्याची माहिती अहे. त्यामुळे परिसरात डेंग्यु आजाराचे तैमान सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अजून काही गावे डेंग्युच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण परिसर डेंग्युमय होऊ शकतो. याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली जात आहे. कोटरा गावाला वगळले तर या संपूर्ण गावाकडे आरोग्य विभागाचे सपेशल दुर्लक्ष आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोटरा गावातील लिलाधर क्षीरसागर, दिपाली बोहरे, मानीकचंद मानकर, सलंगटोला येथील रंजित दाते, मधू दोनोडे, ललीत दोनोडे, सोनेखारी येथील योगेश्वरी पटले, कवडी येथील आशीष साखरे, अक्षय उईके, अंजोरा येथील कांची राणे, राहुल रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, वैशाली अंबुले, तिरखेडी येथील योगेश्वरी मडावी, वडद येथील शालीकराम पारधी, रामपूर येथील उदल बहेकार, कन्हारटोला येथील रमेश तांडेकर, मुकेश ताडेकर, सुनील रहिले, बालू ब्राम्हणकर, चर्जेटोला येथील मनोहर चर्जे, वंदना चर्जे, स्वाती चर्जे, मयाराम चनाप, डेंगू सारख्या आजाराने ग्रस्त असून यातील बरेच रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
काही रुग्ण गोदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंजोरा गावातील बरेच रुग्ण गोंदिया येथील खासगी रुग्णालयात तर काही साखरीटोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तापाचे प्रमाण वाढले. मात्र यात डेंगू ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जानवते. विविध रोगाने आजारी रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी डॉक्टरांची चांदी आहे. या परिस्थितीमुळे असे लक्षात येते की शासनाचे आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र रोगावर आळा घालण्यास यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे लोकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)