शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

जिल्हा परिषद सदस्य उषा हर्षे यांनी समाजकल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी पेंदाम या अधिकाऱ्यांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत निधी वाटपात मोठा भेदभाव केला आहे.

निधी वाटपात गैरप्रकार : जि.प. सदस्य उषा हर्षे यांचा आरोप
आमगाव : जिल्हा परिषद सदस्य उषा हर्षे यांनी समाजकल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी पेंदाम या अधिकाऱ्यांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत निधी वाटपात मोठा भेदभाव केला आहे. त्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप हर्षे यांनी केला आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यात ९ कोटी २२ लाख ५५ हजार रुपये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर झाले. सन २०१३ सप्टेंबरअखेर मंजुरी प्रदान करायची होती. समाज कल्याण अधिकारी यांनी सात महिन्यापूर्वीपासून केवळ आर्थिक देवाणघेवाणकरिता मंजुरी दिली नाही. तालुक्यात ज्या १७ ग्रामपंचायतीला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मंजूर झाले. ज्या ग्रामपंचायतचा प्रस्ताव सादर झाला नाही, तरी त्या ग्राम पंचायतींना निधी मंजूर झाला. प्रस्ताव वेगळ्या दलित वस्तीचे असताना वेगळ्या दलित वस्ती मंजुरी दिली. लोकसंख्येच्या आधारे निधी वाटप जास्त करण्यात आला. सन २००७ पासून काही गावात कामे झाली नाही. मात्र अधिक निधी दर्शवून अपात्र ठरविले. काही गावातील प्रस्तावावर खंड विकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी केली नाही. ठेकेदारांनी परस्पर प्रस्ताव सादर केले. गृहत आरखड्याप्रमाणे कामे मंजूर झाली नाही. बृहत् आराखड्याच्या मंजुरी, आधीच्या चार-पाच वर्षापूर्वीच्या प्रस्तावास मंजुरी कशी? तालुक्यातील गावांना कामे मंजूर करताना पाळीपाळीने मंजूर करायचे होते. मात्र काही गावांना संलग्न दरवर्षी मंजूरी का? ग्रामपंचायत कालीमाटी येथे सन २००७ पासून कामे झाली नाही. मग मंजुरी का नाही. ज्या गावाची कामे मंजूर आहेत, कामे झाली नाही त्या गावांना दोन वर्ष नवीन कामे मंजूर करता येत नाही. परंतु पुन्हा मंजुरी कशी. २१ फेब्रुवारीच्या जि.प.च्या सर्व साधारण सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभेचा त्याग केला.
सभेला सत्ताधारी पक्षाचेच सदस्य उपस्थित होते. सभेत मुद्या क्र.१ मध्ये दलित वस्ती सुधारची कामे नियम बाह्य असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पिठासन अध्यक्ष यांनी सर्व कामांना स्थगनादेश दिला. काही तालुक्यात आदेशाचे पालन करण्यात आले. २२ जानेवारीच्या शासन निकषाप्रमाणे लोकप्रतिनिधींनी सुचविलेले काम मंज़ूर करण्याचे आदेश आहेत. मात्र समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आले. आर्थिक देवाणघेवाणीमुळे अधिकाऱ्यांनी यादीला मंजुरी दिली.
या आदेशाविरुद्ध हर्षे यांनी दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर गोंदिया येथे याचीका दाखल करण्यात आली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करून समाज कल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांना बडतर्फे करण्याची मागणी जि.प. सदस्य उषा हर्षे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)