शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण असंतुलनामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट

By admin | Updated: June 25, 2014 00:31 IST

नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील ४१५ पैकी ३५ जातींचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी

गोंदिया : नागरिकांची अनास्था, वाढती वृक्षतोड व औद्योगिकरणाचा विपरीत परिणाम विविध पक्ष्यांवर होत असून विदर्भातील ४१५ पैकी ३५ जातींचे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास लवकरच हे पक्षी डायनासोरप्रमाणे केवळ चित्रातच बघायला मिळतील, अशी भिती पक्षितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्षांच्या संवर्धनासाठी नागरिक व पक्षिमित्रांच्या साहाय्याने वनविभागाने जनजागृती करून विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. कुठले पक्षी घराच्या आश्रमाला आले तर त्यांना पळवू नका. अन्नाचे दोन घास किंवा मूठभर धान्य टाका, नामशेष होण्याऱ्या या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्या. त्यांनाही मनुष्याच्या मदतीच्या ऊबेची गरज आहे, असे आवाहन पक्षितज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे जागतिक उष्माघाताची समस्या जगापुढे उभी ठाकली आहे. त्याचा परिणाम एकंदरीतच ऋतुचक्रावर होत आहे. तिन्ही ऋतंूची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कालावधीमध्येही बदल होत आहे.
सामान्यत: विदर्भात आढळणारे चिमणी, कबूतर, साळुंखी आणि स्थलांतरित भोरड्याच्या जीवनक्रमावर याचा परिणाम होत आहे. साधारणपणे मार्च ते जुलै हा पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. मात्र निसर्गातील बदल आणि मनुष्याच्या अतिक्रमणामुळे या पक्ष्यांची प्रजनन प्रक्रिया प्रभावित होत असल्याने नव्या पक्ष्यांच्या उत्पन्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विदर्भात पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या गिधाड, सारस, माळढोक, रानपिंगळा, हिरवामुनिया आणि स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
निसर्गाचा सफाई करणारा अशी भूमिका बजाविणाऱ्या गिधाडाच्या तीन जाती विदर्भात आढळत होत्या. परंतु अन्नसाखळीमध्ये आलेला अडथळा, शिकार, विषप्रयोगामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. जगभरात त्यांची संख्या चार कोटींवर होती. ती आता ५० हजारापेक्षाही खाली असल्याचे एका सर्वेक्षणावरून सिध्द झाले आहे. म्हातारी जनावरे विकल्या जात असल्यामुळे पक्ष्यांना मास मिळेनासे झाले आहे.
दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे तापमानातही वाढ होत आहे. याचा परिणामही पक्ष्यांच्या जीवनावर होत आहे. त्यामुळे अनेक पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या पक्ष्यांच्या संवर्धन व संरक्षणाची आता गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)