शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आधी मोबदला ठरवा, मगच टॉवर उभारा

By admin | Updated: April 23, 2017 01:46 IST

रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे.

शेतकरी झाले आक्रमक : मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान रेल्वेची टॉवर उभारणी वांद्यात गोंदिया : रेल्वे विभागासाठी महापारेषण कंपनीकडून उभारल्या जात असलेल्या १३२ केव्ही टॉवर लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला किती देणार हे निश्चित न करताच त्यांच्या शेतजमिनीत टॉवर उभारणी केली जात असल्यामुळे २२ शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रतिटॉवर १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करा, त्यानंतरच काम सुरू करा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आणि वेळप्रसंगी सहकुटुंब आंदोलन करणार, असा इशारा माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे यांच्यासह पीडित शेतकऱ्यांनी शनिवारी दिला. गोंदियात पत्रपरिषदेत याप्रकरणाची माहिती देताना टेंभरे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले की, मुंडीपार ते हिरडामाली यादरम्यान १५ किलोमीटरच्या अंतरात ६४ विद्युत टॉवरची उभारणी केली जात आहे. रेल्वे लाईनसाठी उभारल्या जात असलेल्या या टॉवरची उभारणी करण्याचे काम महापारेषण कंपनीकडे आहे. त्यांनी ते एका कंत्राटदाराला सोपविले आहे. त्या ६४ टॉवरपैकी २२ टॉवर सरकारी जमिनीत आहेत. उर्वरित ४२ टॉवरपैकी २२ टॉवर ज्या २२ शेतकऱ्यांच्या शेतात उभारले जाणार आहे त्यांनी यासंदर्भात योग्य मोबदला देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी महापारेषण कंपनी आणि शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी या कामात अडथळा आणू नये असे निर्देश दिले. तसेच टॉवरचे काम होताच एक महिन्याच्या आत रेल्वे विद्युतीकरण विभागाने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला द्यावा, असे निर्देश दि.१७ एप्रिलला दिले. या पत्रपरिषदेला संजय टेंभरे यांच्यासह रतन बघेले, तुलाराम बिहारी, देवराव फाये, बुधा भगत, श्यामलाल बघेले, प्रल्हाद हरिणखेडे, ओंकार पारधी, गजानन रहांगडाले, रामकुमार हरिणखेडे, चंदन पंधरे, नानुराम बागडे, लिखेंद्र हरिणखेडे, सुनील टेंभरे, सुनील तुरकर, रोषण बोपचे, दिलीप हरिणखेडे, अनिल हरिणखेडे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) नुकसानभरपाई योग्य असावी एका टॉवरच्या कामात १४ ते १५ डेसीमल जमीन जाते. शिवाय शेतजमिनीत असलेले तेवढ्या जागेवरील पीकही जाते. या टॉवरवरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्यामुळे त्याखाली काम करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असते. तरीही योग्य मोबदला मिळाल्यास आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. त्यामुळे आम्हाला प्रतिटॉवर किती मोबदला दिला जाणार, हे आधी स्पष्ट करावे, नंतरच काम सुरू करावे, अशी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करणार असून तोपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये. अन्यथा सहकुटुंब त्या कामाला विरोध करून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा शेतकऱ्यांना दिला.