शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळून युवतीचा मृत्यू

By admin | Updated: June 18, 2014 00:16 IST

घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली.

अर्जुनी/मोरगाव : घरातील सारवणासाठी खडी आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीच्या अंगावर दरड कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सिरोली (महागाव) येथे आज (१७) सकाळी ८.३० वाजता घडली. प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे वेळेवर एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे संतप्त जमावाने धुमाकूळ घातला. लेखी आश्वासनानंतर समजूत घातल्यानंतर त्या युवतीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार सिरोली येथील सिंधू गुलाब चौधरी ही मंगळवारला सकाळी आपल्या दोन मैत्रिणीसोबत घरातील सारवणासाठी खडी आणायला गेली होती. खडी काढण्यासाठी ती खड्यात उतरली. खडी काढत असतांनाच अचानक मातीचा ढिगारा तिच्या अंगावर कोसळला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर हे विना अर्जाने गैरहजर होते. येथे सिंधूवर उपचारच झाले नाहीत. त्याच अवस्थेत तिची सुमारे पाऊण तासपर्यंत मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यावेळी सिरोली व महागाव येथील हजारो महिला-पुरूष प्रा.आ.केंद्रावर चालून गेले त्यांनी डॉ. चांदेकर यांचे प्रती संताप व्यक्त केला.
त्याचवेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मस्के व सरपंच रुपचंद खोब्रागडे यांनी संतप्त जमावाची समजूत घातली व त्या युवतीला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी/मोरगाव येथे हलविले. अगदी ग्रामीण रुग्णालय परिसरात पोहोचताच त्या युवतीचा मृत्यू झाला. गावात युवतीच्या मृत्यूची वार्ता पसरताच जमाव आणखी संतप्त झाला. जोपर्यंत डॉ. चांदेकर यांचे इतरत्र स्थानांतर होणार नाही तोवर त्या मृत युवतीवर अंत्यसंस्कार होणार नाही अशी भूमिका जमावाने घेतली. संजय गुज्जनवार यांनी जमावाला शांत केले. डॉ. गुज्जनवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचे आजच स्थानांतर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्या युवतीवर सिरोली येथे अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. माणिक बिझलवार यांचे फिर्यादीवरून अर्जुनी/मोरगाव पोलिसांनी कलम १७४ जा.फौ. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पो.हवालदार रोशन गोंडाणे तपास करीत आहे.