शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: April 18, 2015 00:36 IST

तालुक्यातील पाथरी येथील एका विद्यार्थिनीचा क्षुल्लक आजाराने मृत्यू झाला.

डॉक्टर निलंबित : कुऱ्हाडी प्रा.आ. केंद्रातील प्रकारगोरेगाव : तालुक्यातील पाथरी येथील एका विद्यार्थिनीचा क्षुल्लक आजाराने मृत्यू झाला. तिच्यावर योग्य उपचार होऊ न शकण्यास कुऱ्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.पी.लांजेवार यांना निलंबित करण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, प्रेमलता भुवनलाल समूने (१६ वर्षे) या दहावीच्या विद्यार्थिनीला दि.१५ एप्रिल रोजी हगवण व उलटीचा त्रास झाल्यामुळे कुऱ्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. सकाळी ८.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीच कर्मचारी व डॉक्टर उपस्थित नव्हते. सकाळी ९.३० वाजता आरोग्य केंद्र उघडण्यात आले, पण परिचारीका व डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचार करण्यास वेळ झाला. शेवटी परिचारीका वानखेडे, सार्वे व एका परिचर महिलेने उपचार सुरु केले, पण उपचार योग्य प्रकारे होऊ न शकल्यामुळे त्या विद्यार्थिनीवर थातूरमातूर उपचार करुन घरी पाठवण्यात आले. घरी आल्यावर प्रेमलताच्या अंगावर चट्टे येऊन तिला घबराट सुटल्याने गोंदिया येथे उपचारासाठी नेण्याचे ठरले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. वास्तविक कुऱ्हाडी प्रा.आ.केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना उपचाराअभावी परत जावे लागते. त्यामुळे गावकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त करणे सुरू केले.या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी नागरिकांसह भाजपा तालुका सचिव बबलू बिसेन, हिरापूरचे सरपंच व भाजपा जिल्हा सहसचिव सतीश रहांगडाले, कुऱ्हाडीचे पोलीस पाटील हेमराज सोनवाने, माजी पं.स. सदस्य मुलचंद खांडवाये, सिद्धार्थ साखरे, आनंद कटरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी सी.पी. लांजेवार उपस्थित नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य सभापती मदन पटले यांनी तातडीने डॉ.आर.डी. त्रिपाठी व डॉ. एन.जी.अग्रवाल यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. त्यात अनेक गैरप्रकार आढळले.