ग्रामीण भागातील रस्ते व कालव्यांची दैनावस्था

By Admin | Updated: February 7, 2016 02:39 IST2016-02-07T02:39:08+5:302016-02-07T02:39:08+5:30

जिल्ह्यातील महामार्ग व राज्य मार्ग गुळगुळीत दिसते. पण ग्रामीण क्षेत्रातील रस्ते खड्यात असल्याने याकडे आमदार, खासदारांचे दुर्लक्ष असल्याच्या बोंबा जिल्ह्यात ठोकल्या जात आहेत.

Dates of roads and canals in rural areas | ग्रामीण भागातील रस्ते व कालव्यांची दैनावस्था

ग्रामीण भागातील रस्ते व कालव्यांची दैनावस्था

१० वर्षांपासून बांधकाम नाही : सिंचनाअभावी शेतकरी मोडकळीस
कालीमाटी : जिल्ह्यातील महामार्ग व राज्य मार्ग गुळगुळीत दिसते. पण ग्रामीण क्षेत्रातील रस्ते खड्यात असल्याने याकडे आमदार, खासदारांचे दुर्लक्ष असल्याच्या बोंबा जिल्ह्यात ठोकल्या जात आहेत.
गोंदियात महामार्गाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. त्यात जिल्हा गतीमान होणार यात शंका नाही. ग्रामीण क्षेत्रातील रस्ते गायब झाल्याचे दिसून येते. नविन रस्ते तयार करून तालुका पातळीवर प्रवास करणे सोईचे होईल. जिल्हा परिषदकडे निधी नसल्याची बोंब ठोकत आहे. यामुळे आमदार व खासदार यांच्या विकास निधीतून रस्त्यांना अच्छे दिनाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील कालव्याची दैनिय अवस्था आहे.
लघु पाटबंधारे विभाग किंवा बाघ सिंचन व्यवस्थापन विभाग अंत्योदय स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कालवे गटारे झाले आहेत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने खंडर म्हणून वास्तवास आहेत.
शेतीसाठी पाण्याची गरज भागविण्याचे कार्य संबंधीत विभाग पार पाडतो. शासन निधीचा शेतीसाठी कमी का पडत आहे, असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहेत.
ग्रामीण परिसरातील रस्ते १२ ते १४ वर्षापासून कालबाह्य झाले आहेत. रस्तेच नसल्यासारखे झाले आहेत. परिसरातील कालीमाटी ते कातुर्ली, इर्री, मोहगाव, धामनगाव, डोंगरगाव, भोसा, करंजी, भोषा, बोदा, बंजारीटोला, आमगाव शहर, सालेकसा, मोरगाव अर्जुनी, गोरेगाव, सडक-अर्जुनी, तिरोडा, गोंदिया ग्रामीण, देवरी या गावातील रस्ते उखडलेले आहेत.
त्यामुळे रुग्ण, प्रवासी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Dates of roads and canals in rural areas