शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

वटवाघुळांचे अस्तित्व आले धोक्यात

By admin | Updated: May 3, 2015 01:28 IST

रात्रीची भयाण शांतता.. जुनी इमारत.. पडका वाडा आणि त्यामध्ये वटवाघुळांचे अस्तित्व,

गोंदिया : रात्रीची भयाण शांतता.. जुनी इमारत.. पडका वाडा आणि त्यामध्ये वटवाघुळांचे अस्तित्व, ही कल्पना भीतीदायक वाटत असली तरी अलिकडे वटवाघूळांची संख्या कमी होत आहे. त्यांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. तसे होऊ नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.वटवाघूळ हा सस्तन पक्षी असून वनविभागाच्या शेड्युल पाचमध्ये त्याचा समावेश आहे. वटवाघूळ निशाचर वृत्तीचा पक्षी आहे. रात्रीच्यावेळी किटक, मुंगी, डास, किडे, पाल, विंचू खावून पोट भरणे व दिवसा सूर्य प्रकाशापासून दूर जावून थंड ठिकाणी गुहा किंवा झाडांच्या फांदीला लोंबकळत निंद्रा घेणे अशाप्रकारे दिवस व रात्रीची दिनचर्या असलेल्या उदर गटातील हा प्राणी होय. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या उंच इमारती, वृक्षतोड, उंच इमारतीवरील चमकणाऱ्या काचा आदी कारणांनी वटवाघूळांचे स्थलांतर होताना त्यांचे प्रजनन सुद्धा थांबते.वटवाघूळांची कमी झालेली संख्या हेच कीटक वाढीचे मुख्य कारण आहे. कारण रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर कीटकांना खाण्याचे काम वटवाघूळ करतात. एका रात्री एक वटवाघूळ साधारणपणे एक हजार डास फस्त करतो. गावाबाहेर असलेल्या पिंपळ व वड या वृक्षांच्या खाली वटवाघूळे असत. वटवाघूळे व घुबड यांच्याबद्दल समाजात अनेक गैरसमज असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये निसर्ग साखळी वाचविण्यासाठी त्यांची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)