शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

ढाकणी येथे धान खरेदी केंद्र सुरू

By admin | Updated: December 31, 2015 01:52 IST

ढाकणी परिसरातील फत्तेपूर, खर्रा, ओझीटोला, पांगळी या आदिवासीबहुल गावातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी जवळ असे कोणतेही धान खरेदी केंद्र नव्हते.

गोंदिया : ढाकणी परिसरातील फत्तेपूर, खर्रा, ओझीटोला, पांगळी या आदिवासीबहुल गावातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी जवळ असे कोणतेही धान खरेदी केंद्र नव्हते. येथील शेतकऱ्यांना पूर्वी आपले धान विक्रीसाठी २० किमी दूर एकोडी केंद्रावर न्यावे लागत होते. मात्र आता ढाकणी येथे २९ डिसेंबरला नवीन धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर झाला.अनेक वर्षांपासून ढाकणी येथे धान खरेदी केंद्र सुरू व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु त्यांच्या मागणीची जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी पूर्तता केली नव्हती. शेवटी त्यांनी आपली ही व्यथा ढाकणीच्या सरपंच प्रीती मेश्राम व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष पंकज यादव यांच्यापुढे मांडली. शेतकऱ्यांची ग्राह्य मागणी लक्षात घेऊन त्यांनी जिल्हा खरेदी-विक्री अधिकाऱ्यांशी चर्चा केली व ढाकणी येथे धान खरेदी केंद्राची मागणी रेटून धरली. त्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार (दि.२९) ढाकणीत केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.केंद्राचे शुभारंभ सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यादव यांच्या हस्ते सरपंच प्रीती मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून संतोष बिसेन, तंमुसचे अध्यक्ष विनोद यादव, वनसमिती अध्यक्ष प्रीतम मेश्राम, देवेंद्र रामटेके, मोहन गौतम, सचिन पालांदूरकर, नितीन टेंभरे, खुशाल मस्करे, ग्रा.पं. सदस्य तुळशीराम मस्करे, डिगूसिंग मडावी, सुनिता नागपुरे, रंजना मस्करे, पोली पाटील संजू रिनाईत, डॉ.एन.एफ. गौतम, राजेंद्र लिल्हारे, गणेशलाल लिल्हारे, कुवरलाल मस्करे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.संचालन संतोष पालांदूरकर यांनी केले. आभार सचिव पटले यांनी मानले. केंद्रात धान विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी सात-बाराची मूळ प्रत व बँक पासबुकची छायांकित प्रत सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)