शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

भाऊबिजेमुळे वाढली एसटी बसेसमधील गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

रविवारी दीपावलीनंतर अनेक बहिणींनी मंगळवारी सासरी पाडवा साजरा केला. त्यानंतर सोमवारपासूनच बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. मंगळवारी भाऊबीज असल्याने, सकाळपासूनच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, ज्यांना भाऊबिजेला जाणे जमले नाही त्या दुसऱ्या दिवशी माहेरी निघाल्या. त्यामुळे स्थानकासह ऑटो स्टॅन्डवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत.

ठळक मुद्देआगाराचे उत्पन्न वाढणार : बस फेऱ्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी आणि पाडव्यानंतर सासुरवासीण बहिणींना माहेरची ओढ लागते.भाऊबिजेपासून मोठ्या प्रमाणात बहिणी माहेरी जातात. त्यामुळे एसटी स्थानकावर प्रवाशांची अलोट गर्दी होत आहे. येथील एसटी स्थानकात बहिणींची माहेरी जाण्यासाठी तर भाऊरायांची बहिणींना आणण्यासाठी एकच लगबग सध्या बघायला मिळत आहे.रविवारी दीपावलीनंतर अनेक बहिणींनी मंगळवारी सासरी पाडवा साजरा केला. त्यानंतर सोमवारपासूनच बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. मंगळवारी भाऊबीज असल्याने, सकाळपासूनच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, ज्यांना भाऊबिजेला जाणे जमले नाही त्या दुसऱ्या दिवशी माहेरी निघाल्या. त्यामुळे स्थानकासह ऑटो स्टॅन्डवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. यामध्ये बहिणी माहेरी जाण्यासाठी तर भाऊ आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना आणण्यासाठी निघाले आहे. बस स्थानकावर प्रवाशांच्या तुलनेत बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेकांची वाताहत होत आहे. तर काही जण खासणी वाहनाने माहेर तसेच सासूरवाडीला जात आहे.शिवशाहीही हाऊसफुल्लपाडवा आणि भाऊबीजनिमित्त एसटी बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे.मात्र नियोजनात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवशाही बसेसलाही सध्या चांगले दिवस आले असून प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. दिवाळीत प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. महामंडळाला उत्पन्न मिळून देणाऱ्या या सणानिमित्ताने दरवर्षी नियोजने नियोजन केले जाते. त्यानुसार लांबपल्ल्याच्या बसेस सोडण्यात येतात. यंदा महामंडळाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शिवशाही बसेस सुरू केल्या आहे. नागपूर, अमरावती, पूणे आदी मार्गावर शिवशाही बसेस धावत आहेत. परंतु दिवाळीनिमित्त सद्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशातच बसेसला ऑनलाईन बुकींग असल्यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.वेळापत्रक ढासळलेदिवाळीत बसेसला होणारी गर्दी लक्षात घेता. महामंडळाने नियोजन केले आहे. मात्र वेळेवर बस जात नसल्याने अनेकांना ताटकळत बसावे लागत आहे. बसमध्येही जागा मिळणे कठीण झाले आहे.

टॅग्स :state transportएसटी