धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:21+5:30

शहरातील गोरेलाल चौक व दुर्गा चौकात सराफा लाईन आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीला सोने चांदीची मागणी लक्षात घेऊन सराफा व्यावसायिकांनी विविध दागिने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते. दिवाळी दरम्यान सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यातच धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

Crowds of consumers to buy gold at Dhanatrayoshi | धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

ठळक मुद्देलाखो रुपयांची उलाढाल : सराफा बाजारात उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.त्यामुळे शुक्रवारी (दि.२५) सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शहरातील सराफा दुकानात मोठी गर्दी केली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी लाधो रुपयांच्या सोने आणि चांदीची विक्री झाल्याचे सराफ व्यावसायिक देखील सुखावल्याचे चित्र होते.
शहरातील गोरेलाल चौक व दुर्गा चौकात सराफा लाईन आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीला सोने चांदीची मागणी लक्षात घेऊन सराफा व्यावसायिकांनी विविध दागिने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते. दिवाळी दरम्यान सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यातच धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे वर्षभर केलेल्या बचतीतून सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक आग्रही असते. शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासूनच सराफा लाईनमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होतीे. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ग्राहकांच्या गर्दीत वाढ झाली होती. सराफा व्यावसायीकांनी दिलेल्या माहितीनुसार धनत्रयोदशीला दिवसभरात ५ ते ६ कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. दरम्यान धनत्रयोदशीमुळे बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलल्याने व्यापारांमध्ये सुध्दा समाधानाचे वातावरण होते. बाजारपेठेतील सर्वच दुकांनामध्ये शुक्रवारी गर्दी दिसून आली.

बाजारपेठ गर्दी फुलली
दिवाळी निमित्त विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत शुकशुकाट होता.धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांनी सोने, कपडे तसेच इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. ग्राहकांच्या गर्दीमुळे गोरेलाल चौक परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

Web Title: Crowds of consumers to buy gold at Dhanatrayoshi

टॅग्स :Goldसोनं