पीक विम्यासाठी संयुक्त पंचनामे ग्राह्य धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:21+5:30

पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसानीचा संपूर्ण अहवाल पोहचला नसल्याची माहिती आहे.

Crop insurance will be accepted in the Joint Panchayat | पीक विम्यासाठी संयुक्त पंचनामे ग्राह्य धरणार

पीक विम्यासाठी संयुक्त पंचनामे ग्राह्य धरणार

Next
ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब : आत्तापर्यंत ३३१५ पंचनामे, परतीच्या पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले. पीक विमा कंपनीने सुध्दा नुकसानीची सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.मात्र पीक विमा कंपनीकडे अपुरी आहे.परिणामी पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे केलेले नुकसानीचे पंचनामे पीक विमा कंपनीने ग्राह्य धरणाचे निर्देश शासनाने दिले आहे.त्यामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास जरी विलंब झाला असेल तरी त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील ७० हजार ३० शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत एकूण ३९ हजार १२९ हेक्टरचा पीक विमा काढला. मात्र यंदा पीक परिस्थिती चांगली असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरले.परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घ्यास हिरावला गेला आहे. पावसामुळे १० हजार हेक्टरमधील धानपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. तसा अहवाल देखील कृषी आणि महसूल विभागाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले असल्यास त्यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीकडे अर्ज अनिवार्य होते. अन्यथा ते शेतकरी मदतीस अपात्र ठरणार होते.अशी अट विमा कंपनीने लागू केली होती.मात्र जिल्ह्यातील ७० हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांपैकी २६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर इतर शेतकऱ्यांनी अर्ज केले नव्हते.
त्यामुळे ते पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर पीक विमा कंपनीकडे मनुष्यबळ कमी असल्याने आत्तापर्यंत केवळ ३३१५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र शासनाने यावर तोडगा काढत कृषी आणि महसूल विभागाने पिकांचे नुकसानीचे केलेले पंचनामे विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहे.त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला असून अर्ज न केलेले पीक विमाधारक शेतकरी सुध्दा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मदतीसाठी करावी लागणार प्रतीक्षा
पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसानीचा संपूर्ण अहवाल पोहचला नसल्याची माहिती आहे.

Web Title: Crop insurance will be accepted in the Joint Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.