शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांचा ग्राफ पुन्हा डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या प्रभावी उपाययोजना केल्या. त्याचे सुध्दा ग्रामीण भागात चांगले परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात ९४५ गावांपैकी आतापर्यंत दोनशेवर गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

ठळक मुद्दे७३ बाधितांची कोरोनावर मात : ४० नवीन बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोदिया : ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांचा ग्राफ सातत्याने डाऊन होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांचा आलेख उंचावत असून रविवारी (दि.११) जिल्ह्यातील ७३ बाधितांनी कोरोनावर मात केली. ४० नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मागील सात महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात कोरोनाचा अधिक संसर्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी गावबंदी, गावाचे सॅनिटायझेशन आणि जनता कर्फ्यू सारख्या प्रभावी उपाययोजना केल्या. त्याचे सुध्दा ग्रामीण भागात चांगले परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यात ९४५ गावांपैकी आतापर्यंत दोनशेवर गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर ७५० वर गावांनी कोरोनाला अद्यापही वेशीवरच रोखल्याचे दिलासादायक चित्र आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित हे गोंदिया, तिरोडा आणि आमगाव तालुक्यात आढळले आहे. गोंदिया आणि आमगाव तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. तर उर्वरित तालुक्यात परिस्थिती आटोक्यात आहेत. जिल्ह्यात रविवारी (दि.११) आढळलेल्या ४० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक २५ कोरोना बाधित हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तर तिरोडा ९, गोरेगाव ०, आमगाव १, सालेकसा १, देवरी १, सडक अर्जुनी १ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७८५६ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ७१०५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ६४४ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३३१३५ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २५८८६ नमुने निगेटिव्ह आले आहे. २०५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या