शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ ऑपरेटर वेळेत न पोहचल्याने नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:14 IST

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० ...

गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गोंदिया येथे शनिवारी (दि.१५) १० केंद्रावर विशेष लसीकरण अभियान आयोजित केले होते. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पण सकाळी ९.३० वाजतापर्यंत गोंविदपूर येथील केंद्रावर कर्मचारी न पोहचल्याने नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. 

स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रावर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिध्द पत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रावर सकाळी ८ वाजतापासूनच गर्दी केली होती. शहरातील गोंविदपूर येथे नगर परिषद शाळेत लसीकरण केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रावर नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळी ८ वाजतापासूनच रांग लावली. पण केंद्रावर सकाळी ९.३० वाजेपर्यंत ऑपरेटरच न आल्याने नागरिकांचा चांगला गोंधळ उडाला. 

नागरिकांचा गोंधळ वाढल्यानंतर केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांनी ऑपरेटरला बोलाविले. ऑपरेटर आला मात्र लाॅगिंग आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याने लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. याच सर्व गोंधळात १० वाजल्याने सकाळपासून रांगेत असलेल्या नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला. यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

दरम्यान १०.१५ वाजताच्या सुमारास लॉगिंग झाल्याने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र या सर्व प्रकारामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

नियोजनचा अभाव

स्थानिक प्रशासनाने शनिवारी गोंदिया शहरातील नगर परिषद शाळा गणेशनगर, नगर परिषद शाळा गोविंदपूर, नगर परिषद हायस्कूल रामनगर, नगर परिषद गर्ल्स हायस्कूल अग्रसेन भवनजवळ, जे. एम. पटेल शाळा अवंती चौक, मालवीय स्कूल श्रीनगर, मनोहर म्युनिसिपल हायस्कूल स्टेडियमजवळ, नगर परिषद शाळा माताटोली, नगर परिषद शाळा रेलटोली गुजराती शाळेजवळ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर या केंद्रावर लसीकरणाची सोय केली होती. यासाठी सकाळी ९ वाजताची वेळ देण्यात आली. पण ऑपरेटरच ९.३० वाजतापर्यंत केंद्रावर पोहचला नव्हता. तर लसीकरणाच्या संकेत स्थळाचे लाॅगिंग आयडी आणि पासवर्डचा घोळ कायम होता. एकंदरीत नियोजनाचा पूृर्णपणे अभाव होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस