शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार

By admin | Updated: April 24, 2016 01:52 IST

तलाठ्यांनी विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. शासनाने तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे २१ एप्रिलपासून संगणकीकृत...

विविध मागण्यांचा समावेश : तलाठ्यांचे धरणे आंदोलनगोंदिया : तलाठ्यांनी विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. शासनाने तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे २१ एप्रिलपासून संगणकीकृत कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. २६ एप्रिलपासून संपूर्ण तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघातर्फे देण्यात आला. तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देणे, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौणखनिज वसूली या कामातून तलाठ्यांना वगळणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे व अंशदायी निवृत्त वेतन योजनेला घेऊन तलाठ्यांचे आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात आर.पी.वैद्य, जिल्हाध्यक्ष एम.एम.लिल्हारे, सचिव बी.डी. भेंडारकर, सहसचिव डी. बी. हत्तीमारे, एन.बी. वर्मा, आर.एस. बोळखे, पी.एस. कुंभरे, डब्ल्यु.एफ. कोहालकर, यु.एस. वाघधरे, सी.एन. सोनवाने, पी.बी. तिवारी, डी.एच. पोरचेट्टीवार, रियाज तुर्क, मनोज पांडे, दिपक नागदेवे, राजेश ठाकरे, आर.एच. मेश्राम, डी.एन. मेश्राम, के.एम. पटले, डी.टी. कठाणे, जी.व्ही. गाढवे, विवेक बाबरे, सुनील राठौड, हेमलाल बिसेन, डी.एम. बनोटे व मंडळ अधिकारी लांजेवार याच्या आंदोलनात समावेश आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली काही तलाठ्यांनी त्याच मागण्यांना घेऊन संप पुकारला. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय धार्मिक, सचिव महेश कांचनवार, उपाध्यक्ष जे.आर. जांभूळकर, मदन चुरे, राजकुमार भाजीपाले, अजित भोवते, वर्षा वाढई, राजेश मेनन, पी.झेड. बिसेन, आशिष रामटेके, आर.डी. रहांगडाले, एन.के. पराते, एम.एम. शुक्ला, संदीप रहांगडाले, गणेश लाडे, एम.एस.शिवरकर, बडवाईक यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)