शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे विविध पिके प्रभावित

By admin | Updated: October 27, 2014 22:37 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही

गोंदिया : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही धोका उद्भवू शकतो, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले आहे. यंदा सुरूवातीपासूनच पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. आता हलका धान कापणीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली असून धान शेतात ठेवला आहे. ढगाळ वातावरणात पाऊस कधीही पडल्यास धानाला नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका पुन्हा शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हलक्या धानाची कापणी केली नाही, त्या पिकावर सावरदेवी नामक रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यात धानाचे लोंब गळून पडते व त्यामुळे उत्पादनात घट होते. शिवाय कापलेले धान पाऊस आल्यास भिजून खराब होण्याची शक्यता आहे. भारी धानपीक परिपक्वतेत असून दाने भरण्यासाठी त्यांना उन्हाची गरज आहे. परंतु ढगाळ वातावरण त्यांना बाधक ठरत आहे. यामुळे शेतकरी पेचात सापडला आहे. डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीचे पीक प्रमुख समजले जाते. परंतु काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे तुर पीक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर अळी लागून फुले व कळ्या पोखरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बागायती पिकांमध्ये कांदा हा जमिनीतच सडण्याची शक्यता आहे. टमाटर व केळीसारखी पिकेही किरकोळ प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. भेंड्यांवर अळींनी आक्रमण केले असून मोठ्या संख्येत भेंड्या पोखरल्या गेल्या आहेत. त्यांच्याही उत्पादनात घटच होईल. एकंदरीत हे ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे. शेतकऱ्यांनी आपले विविध प्रकारचे पीक वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषधांची फवारणी केल्यास किडींचा तातडीने नायनाट करता येईल व पिके वाचविता येतील. यासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे वाटप करण्यात आले. पिकांबाबत उद्भवणाऱ्या समस्यांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, कृषी अधिकारी, सहायक व कृषिमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)