सहायक निबंधक कार्यालय २४ तास बंद

By Admin | Updated: June 14, 2014 23:42 IST2014-06-14T23:42:30+5:302014-06-14T23:42:30+5:30

महाराष्ट्र शासनाचे तालुक्यातील महत्वपूर्ण सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, कर्मचाऱ्यांच्या अभावी २४ तास बंद पडत असल्याने सहकारी संस्थानाचे कार्य फाईल बंद झाले आहेत. त्यामुळे संस्थानाचे कार्य

Closure of Assistant Registrar Office 24 hours | सहायक निबंधक कार्यालय २४ तास बंद

सहायक निबंधक कार्यालय २४ तास बंद

आमगाव : महाराष्ट्र शासनाचे तालुक्यातील महत्वपूर्ण सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, कर्मचाऱ्यांच्या अभावी २४ तास बंद पडत असल्याने सहकारी संस्थानाचे कार्य फाईल बंद झाले आहेत. त्यामुळे संस्थानाचे कार्य व नागरिकांना मिळणारी सेवा ठप्प झाली आहे.
आमगाव तालुक्यातील शासनाचे महत्वपूर्ण सहायक निबंधक कार्यालय शासनाच्या आडकाठी धोरणामुळे सेवा देण्यास अपयशी ठरत आहे. प्रवृत्त होत आहे. या कार्यालयातील मुख्य अधिकारी सहाय्यक दुय्यम निबंधकाचे कायमचे अस्थाई पद भरण्यासाठी शासनाने योग्य भूमिका घेतली नाही. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज प्रभारी अधिकाऱ्यावर असतो. अनेकदा हे कार्यालय कर्मचारीच सांभळतात. त्यामुळे या कार्यालयातील कार्यालयीन कामावर अनास्था नसलेली कर्मचारी वर्ग आपल्या कर्तव्यातून काढता पाय घेतांना दिसतात.
सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधकाचे पद सुरूवातीपासूनच रिक्त आहे. या पदावर डी.आर. पिंजरकर यांना अतिरीक्त अधिभार देण्यात आला. तर दोन कनिष्ठ लिपीकसह शिपाई पद रिक्त आहेत.
कार्यालयात दोन लिपीक कार्यरत आहेत. परंतु या दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून रजा घेतली आहे. पर्यायी व्यवस्था विभागाकडे नाही. त्यामुळे कर्मचारी आलेत तर कार्यालय उघडे नाही तर कुलूप बंद अशी अवस्था या कार्यालयात आढळून येते.
दुय्यम निबंधक कार्यालयातील फाईलबंद कार्य प्रणालीमुळे तालुक्यातील दैनंदिन कामावर प्रभाव पडला आहे. शासनाने तालुक्यात कार्यालय दिले. परंतु कार्यालयातील सुविधांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे कार्यालयात येणाऱ्यांची मात्र फजीती होत आहे. आमगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात रिक्त असलेली पदे भरून कायमस्वरूपी निबंधक देण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Closure of Assistant Registrar Office 24 hours