शहर थांबले पण माणुसकी थांबली नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:20+5:30

एक हात मदतीचा...एक हात मानवतेचा हे ब्रीद बाळगून उपेक्षितांना तांदूळ, तिखट, हळद, चहा पावडर, साबण, डाळ आदि जीवनावश्यक सामग्री पुरविण्याचा उपक्रम ठाणेदार राजकुमार डूणगे, गडमाता ट्रस्ट, राजू काळे, देवराम चुटे, श्यामलाल दोनोडे, सरपंच गजानन राणे, महेश क्षिरसागर, राजू दोनोडे, सतीश अग्रवाल, सागर राठोड, सुनील तिरपुडे, प्रल्हाद मेंढे यांच्या विशेष सहकार्यातून राबविला जात आहे.

The city stopped but humanity did not stop! | शहर थांबले पण माणुसकी थांबली नाही !

शहर थांबले पण माणुसकी थांबली नाही !

Next
ठळक मुद्देसंस्थांची मदत ठरली लाख मोलाची : गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे केले वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : लॉकडाऊनमुळे सर्वत्र भयान शांततेसह रस्त्यांवर शुकशुकाट आहे. हॉटेल, दुकाने व त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी बरीच प्रतिष्ठाने बंद आहेत. अशात भिकारी, अंध-अपंग व निराधारांच्या घरची चूल विझली आहे. याची दखल घेत पोलीस ठाणे, दिव्या फाऊंडेशन, रेड क्रॉस सोसायटी, प्रेरणा मित्र परिवार, गोटुल संस्था, सुर्योदय क्र ीडा मंडळ तालुका पत्रकार संघाच्या संयुक्तवतीने बाबाटोली येथील नागरिकांना उपजीविकेसाठी अन्नाची सोय व्हावी म्हणून तांदूळ व इतर वस्तू देण्यात आल्यात.
एक हात मदतीचा...एक हात मानवतेचा हे ब्रीद बाळगून उपेक्षितांना तांदूळ, तिखट, हळद, चहा पावडर, साबण, डाळ आदि जीवनावश्यक सामग्री पुरविण्याचा उपक्रम ठाणेदार राजकुमार डूणगे, गडमाता ट्रस्ट, राजू काळे, देवराम चुटे, श्यामलाल दोनोडे, सरपंच गजानन राणे, महेश क्षिरसागर, राजू दोनोडे, सतीश अग्रवाल, सागर राठोड, सुनील तिरपुडे, प्रल्हाद मेंढे यांच्या विशेष सहकार्यातून राबविला जात आहे.
‘लॉकडाऊन’च्या काळात पैसे असणारे सक्षम लोक घरात राहून उपजीविका भागवू शकतात. मात्र रस्त्यावरील भिक्षेकरी, मनोरु ग्ण किंवा निराश्रीत व गरजूंचे अन्नाविना प्रचंड हाल होत असल्याची भावना लक्षात घेऊन त्यांना २ घास खाता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
भुकेलेल्याला अन्नदान करण्यासारखे दुसरे पूण्य नाही. ‘दानात पुण्य आणि सेवेत आनंद’ असे ब्रिद घेऊन येथे हा उपक्र म सुरु आहे.
यासाठी मधुकर हरिणखेडे, चंद्रकुमार बहेकार, राहुल हटवार, राकेश रोकडे, पवन पाथोडे, प्रकाश टेंभरे, निलेश बोहरे, राहुल बनोठे, विजय फुंडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, शैलेश बहेकार, योगेश कावडे, सूर्यकांत येडे, राजेंद्र बिसेन, हसन सय्यद, राजेंद्र बागडे, चंद्रशेखर बहेकार, गुन्नीलाल राऊत, मुस्ताक अन्सारी, संजय कटरे, महेंद्र कापसे, कुमार श्रीवास्तव, गोल्डी भाटिया, रीता मिश्रा , यादव मेजर , संतोष चूटे, खोब्रागडे मेजर, राजेश अग्रवाल, करवाडे यानी पुढाकार घेतला आहे. संस्थांचे सर्व पदाधिकारी निरंतर सेवा कार्यात जुळले आहेत.
 

Web Title: The city stopped but humanity did not stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.