शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुक्त शहरसाठी नगर परिषदेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

प्लास्टिकचा वापर पर्यावरणासह मानव पशुंसाठीही धोक्याचा ठरत आहे.पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच प्लास्टिकमुळे पशुंचा जीव जात आहे.शिवाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.प्लास्टिक वापराचे हे दुष्परिणाम बघता राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजनजागृती मोहीम सुरू : आराखड्यानुसार करावी लागणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १ मे पासून शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त शहर झाले पाहिजे असे निर्देश पर्यावरण विभागाने दिले आहेत. त्यानुसार नगर परिषद कामाला लागली असून स्वच्छता विभागाकडून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी आराखडा पाठविण्यात आला असून त्यानुसार नगर परिषदेला कारवाई करावी लागणार आहे.प्लास्टिकचा वापर पर्यावरणासह मानव पशुंसाठीही धोक्याचा ठरत आहे.पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच प्लास्टिकमुळे पशुंचा जीव जात आहे.शिवाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.प्लास्टिक वापराचे हे दुष्परिणाम बघता राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. असे असताना आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर सुरूच असून नागरिकही सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहे.सिंगल युज प्लास्टिकचा हा अतिरेकी वापर थांबावा या दृष्टीने आता पर्यावरण विभागाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने विभागाने सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतींना १ मे पर्यंत आपापले शहर सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्याचे निर्देश दिले. यासाठी करावयाचा आराखडाही पाठविला आहे.या आराखड्यात संबंधितांना काय-काय करावयाचे आहे याबाबत कळविण्यात आले आहे. त्यातील पहिला म्हणून नगर परिषद स्वच्छता विभागाने शहरातील व्यावसायिकांशी संपर्क साधून सिंगल युज प्लास्टिक वापरू नये याबाबत सांगितले जात आहे. त्यांच्याकडून प्लास्टिक वापरणार नाही असे स्वयंघोषणापत्र भरुन घेतले जात आहे.सुमारे १०० व्यावसायिकांचे भरले घोषणापत्रनगर परिषद स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिक वापरावर निर्बंध बसावा. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम त्यांना कळावे या दृष्टीने शहरातील व्यावसायिकांची भेट घेऊन जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत व्यावसायिकांना बंदी असलेले व बंदी नसलेल्या प्लास्टीक साहित्यांची माहिती असलेले पत्रक दिले जात आहे. या व्यावसायिकांकडून प्लास्टिक वापरणार नाही, असे स्वयंघोषणा पत्र भरुन घेतले जात आहे. अशाप्रकारे सुमारे १०० हून अधिक व्यवसायीकांचे घोषणापत्र भरुन घेण्यात आले आहेत

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी