शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत १५ वेळा छत्तीसगड एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 01:58 IST

मागील अनेक दिवसांपासून अप मार्गावरील बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३७) सतत रद्द होत असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

प्रवाशांची गैरसोय : रेल्वेकडून धुक्याची सबबगोंदिया : मागील अनेक दिवसांपासून अप मार्गावरील बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३७) सतत रद्द होत असल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०१६ या दोनच महिन्यांत छत्तीसगड एक्सप्रेस १५ वेळा रद्द करण्यात आली आहे. यामागे दिल्ली परिसरात धुक्याचे वातावरण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तब्बल सात वेळा छत्तीसगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती. यात १० जानेवारी, १३, १७, २०, २४, २७ व ३१ जानेवारी अशा सात दिवसांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात ३, ७, १०, १४, १७, २१, २४ व २८ फेब्रुवारीला छत्तीसगड एक्सप्रेस रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वेगाडी रद्द होण्याची पूर्वसूचना आधीच रेल्वे प्रशासनाने जाहीर केली असून यामागे दिल्ली परिसरात असलेले धुक्याचे वातावरण जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे. धुक्यांमुळे चालकाला अंदाज बांधणे कठिण होत असून गाडी सुरूवातीपासूनच ८ ते १० तास उशिरा धावते.अप मार्गावर गोंदिया रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५.४५ वाजता पॅसेंजर गाडी (५८२०५), छत्तीसगड एक्सप्रेस सायंकाळी ७.१८ वाजता व सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस ८.५० वाजता सुटते. पॅसेंजरच्या वेळेपर्यंत अनेकांची कामे न आटोपल्यामुळे ते छत्तीसगड एक्सप्रेसने जाण्याच्या तयारीत असतात. मात्र वेळेवर छत्तीसगड एक्सप्रेस रद्द झाल्याचे कळल्यावर त्यांना रात्री ९ वाजतापर्यंत इंटरसिटी एक्सप्रेसची वाट पाहत बसून रहावे लागते. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठाच मनस्ताप होत असून त्रास सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या प्रभावितदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मंडळांतर्गत दुर्ग-गोंदिया-कलमना (अप लाईन) खंडावर ट्रॅकच्या रखरखाव कार्यासाठी ५ फेब्रुवारीला रात्री ८.४० ते ६ फेब्रुवारीला रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.५) गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर शिवनाथ एक्सप्रेसला एक तास व गाडी (५८१११) टाटानगर-इतवारी पॅसेंजरला ३० मिनिटे दुर्ग स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.५) गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमू, गाडी (६८७२३) डोंगरगड-गोंदिया मेमू, गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड लोकल व शनिवार (दि.६) गाडी (६८७२४) गोंदिया-दुर्ग-रायपूर लोकल व गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर लोकल रद्द राहणार आहेत.