शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या भावविश्‍वात होतोय बदल

By admin | Updated: June 6, 2014 00:02 IST

काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्‍वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच

गोंदिया : काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्‍वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या जगण्यातही खूप वेगळेपणा आला आहे. पूर्वीचे खेळ भावना, संवेदनांशी संबंधित होते. निसर्गाशी जुळलेले होते. आता मात्र मुले निसर्गापासून आणि मैदानी खेळांपासून नकळतपणे दूर होत आहेत. पूर्वी आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो, शिवाशिवी, दोरीवरच्या उड्या, फुगडी, विषामृत, लगोरी, कंचे, विटी-दांडू, टिक्कर-बिल्ला, लपाछपी, सळाक खुपसणी, भातुकली, साखळी शिवाशिवी, दोघांचा एक-एक पाय बांधून खेळणे, आंधळी कोशिंबीर, तळ्यात-मळ्यात, चंगा अष्टा, भोवरा फिरविणे असे सारे खेळ मुलांच्या बुद्धीला आणि शरीराला व्यायाम देणारे होते. आताही यातले काही खेळ मुले खेळतात, पण मुलांचा ओढा मात्र तंत्रज्ञानाशी संबंधित खेळांकडे वाढला आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टय़ा आहेत. त्यात मुले सध्या वेगवेगळ्या शिबिरात तर काही घरातल्या संगणकावर गेम्स खेळण्यात व्यस्त आहेत. या सार्‍यांमध्ये काही गोष्टींची पुस्तकेही मुले विसरत चालली आहेत. पूर्वी बहुतेक मुलांना कॉमिक्सचे वेड होते. आता त्याऐवजी टीव्हीवरील काटरुन चॅनल पाहणे मुलांना जास्त आवडते. पालकांच्या सजगतेने मुलांना काही पारंपरिक खेळ सांगितले जात आहेत. यात दुपारी मुलांनी उन्हात न खेळता सावलीत बैठे खेळ खेळावेत हाच पालकांचा उद्देश असतो. यासंदर्भात लोकमतने शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातील मुलांशी बोलून, पाहणी करून काढलेला निष्कर्ष. पहिली पसंती क्रिकेटलाच वय कुठलेही असो पण मुलांना क्रिकेटने फार वेड लावले आहे. प्लास्टिकच्या बॅटपासून लाकडी बॅटपर्यंत बॅट कुठलीही असो, शेजारच्या मुलांसह क्रिकेट खेळण्यात तासन्तास मुले व्यस्त आहेत. जवळपास अपार्टमेंट संस्कृतीत किंवा कॉलनीत राहणारी मुले पार्किंगच्या जागेत दुपारच्या वेळेत भन्नाट क्रिकेटमध्ये रंगली आहेत. एकूण मुलांची संख्या किती आहे. त्याप्रमाणे सम आणि विषम संख्येच्याही दोन चमू तयार करून मुले क्रिकेट खेळत आहेत. हा खेळ त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की, स्कोअर बोर्ड, पंच आदींचीही व्यवस्था मुलांनी केल्याचे दिसून येते. त्यात त्यांचा लंच टाईमही काटेकोर ठरला आहे. पालकांकडे हट्ट धरून डझनभर बॉलची व्यवस्था या मुलांनी आधीपासूनच केली आहे. कारण कुणी जोरात चेंडू टोलविला आणि एखाद्याच्या खिडकीची काच तोडून चेंडू घरात गेल्यावर तो परत मिळणार नाही, याची खात्री मुलांना आहे. चेंडू मिळाला नाही तर खेळ बंद. त्यामुळे एक चेंडू हरविला वा कुणी परत दिला नाही तर खेळात व्यत्यय येऊ नये म्हणून ही काळजी आहे. पण शहराच्या कुठल्याही भागात सहजपणे नजर टाकली तर सर्वात जास्त पसंती क्रिकेटलाच असल्याचे लक्षात येते. यातूनच छोटीमोठी भांडणे आणि कुरबुरीही वाढतात. पण पुन्हा सारे विसरून खेळ सुरू होतो.काटरुन्स, संगणकाचे खेळसध्या गुगल प्लेवर मुलांसाठी प्रचंड खेळ आहेत. अनेकांकडे संगणक आणि टॅब आहेत. घराघरात स्मार्ट फोन आले आहेत. पालकांकडील किंवा भाऊ-बहिणीकडील मोबाईल रिकामा दिसला की मुले तो सोडत नाहीत. त्यावर अनेकांनी वेगवेगळे खेळ डाऊनलोड केले आहेत. मध्यमवर्गीय घरात मात्र मुले संगणकावर खेळ खेळण्यात व्यस्त आहेत. संगणकावर आवडीचा खेळ खेळण्यासाठी दोन भावंडांमध्ये भांडणे होत असल्याची स्थिती आहे. मुले घरी एकटी असल्याने यासंदर्भात पालकांचा नाईलाज होत असल्याचे दिसून येते.