सर्व उत्सव शांततेत साजरे करा

By Admin | Updated: October 16, 2015 02:41 IST2015-10-16T02:41:55+5:302015-10-16T02:41:55+5:30

उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले.

Celebrate all the celebrations in peace | सर्व उत्सव शांततेत साजरे करा

सर्व उत्सव शांततेत साजरे करा

शांतता बैठक : उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांचे आवाहन
सडक अर्जुनी : उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले.
तालुक्यात शांतता व सुरक्षा ठेवण्यासाठी, जातीय व धार्मिक सलोखा कायम ठेवून दुर्गा उत्सव, शारदा उत्सव, धम्मचक्रप्रवर्तन दिन, मोहरम या उत्सवांना कोणत्याही अपकृत्यांचे गालबोट लागणार नाही, याकरिता तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे शांतता बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी होते. मार्गदर्शक म्हणून देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, तहसीलदार व्ही.एम. परळीकर, डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी म्हणाले, कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण होवू देवू नका. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विजेची चोरी न करता विद्युत मीटर घ्यावे. गुलाल जास्त उधळू नका, निर्माल्य एका ठिकाणी जमा करा व प्रशासनाला सहकार्य करा, असे मार्गदर्शन केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना म्हणाल्या, नवरात्रोत्सव साजरा करताना स्त्रिया जास्त सहभागी होतात. कोणत्याही स्त्रियांना त्रास होता कामा नये. स्त्रियांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. फटाके फोडताना ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यता कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. तहसीलदार व्ही.एम. परळीकर यांनी, आनंद उत्सव साजरा करताना डी.जे. कमी आवाजात वाजवावे, जोरात वाजवू नये. त्यांचे प्रदूष जास्त होते, असे मार्गदर्शन केले. डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे म्हणाले, उत्सव आपल्याला आनंद देवून जातात. परंतु आपल्याकडून आनंदात उत्सव साजरा व्हावा आणि कोणत्याही प्रकारे कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम असावी. कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. आम्ही तुम्हाला साथ देतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायद्याचे उल्लंघन करु नका, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी सडक अर्जुनी तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्त समित्यांचे पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी शांतता बैठकीला उपस्थित होते. संचालन प्रा. राजकुमार भगत यांनी केले. आभार निशांत राऊत यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Celebrate all the celebrations in peace