शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कॉमन लेपर्डला म्हणा आता बिट्टी आणि स्मॉल लेपर्डला छोटी बिट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:17 IST

महाराष्ट्रत आढळणाऱ्या ‘कॉमन लेपर्ड’ या फुलपाखरास बिट्टी तर ‘स्मॉल लेपर्ड’ या फुलपाखरास छोटी बिट्टी अशी ओळख आता नव्याने दिली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जैवविविधता मंडळाचा उपक्र म केरळ नंतर देशातील दुसरे राज्यफुलपाखरांना मिळाली नवी मराठी ओळख

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र जैवविविधता मंडळच्या समितीने राज्यातील सहा कुळातील २७७ फुलपाखरांच्या इंग्रजी नावांना आता मराठी नावे दिली आहे. ही नावे देतांना फुलपाखरांचा रंग, ठिपके, प्रकार यासर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात आला.राज्यातील फुलपाखरांचा अभ्यास हा ब्रिटिश काळात झाल्याने फुलपाखरांना ब्रिटिश कालीन नावे देण्यात आली होती. पण आता इंग्रजीतील कठीण नावाऐवजी स्थानिक मराठी नावे देण्यात आली आहेत.राज्यातील पशू पक्ष्यांप्रमाणे स्थानिक भाषेत फुलपाखरांची देण्यात यावी. यामुळे फुलपाखरांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होईल. महाराष्ट्रत आढळणाऱ्या फुलपाखरांना स्थानिक नावांची ओळख मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र जैवविविधता मंडळच्या समितीने राज्यातील विविध जैवविविधता अभ्यासक, तज्ञ, निसर्गप्रेमी व फुलपाखरांच्या अभ्यासकांना सूचना व नावे सुचविण्याचे आवाहन विविध माध्यमातून केले होते. पूर्व विदर्भात नवेगावबांध-नागझिरा अभयारण्य, ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा निसर्ग संपन्न परिसर आहे. या भागात सुध्दा फुलपाखरांच्या विविध प्रजाती आढळतात. त्यांचा अभ्यास सुध्दा काही पक्षी अभ्यासक आणि वन विभागाचे अधिकारी करीत आहेत. पूर्व विदर्भात आढळणाºया फुलपाखरांना वैर्द्भीय नावांची ओळख मिळावी म्हणून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनविभागात व सध्या भंडारा वनविभागात कार्यरत असलेले फुलपाखरांचे अभ्यासक, निसर्गप्रेमी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांनी काही स्थानिक फुलपाखरांची मराठी नावे महाराष्ट्र जैवविविधता मंडळाला सुचवली होती. यावर महाराष्ट्र जैवविविधता मंडळच्या समितीने अंतिम बैठकीत अंतिम रुप देतांना दोन फुलपाखरांची नावे स्विकारली आहेत. महाराष्ट्रत आढळणाऱ्या ‘कॉमन लेपर्ड’ या फुलपाखरास बिट्टी तर ‘स्मॉल लेपर्ड’ या फुलपाखरास छोटी बिट्टी अशी ओळख आता नव्याने दिली आहे.

मराठी नावांची व्हावी प्रचार प्रसिध्दीराज्यातील फुलपाखरे आणि मराठी नावे याची माहिती देणारे पुस्तक छायाचित्रांसह नुकतेच प्रसिध्द केले आहे. फुलपाखरांना दिलेली नावे अधिकाअधिक प्रचिलत व्हावीत यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घेऊन ती सर्वांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.

नावे ठरवितांना या गोष्टींचा विचारफुलपाखरांची मराठी नावे ठरवितांना त्यांचे रंग, रुप, आकार, अंगावरील ठिपके, वागणूक ईत्यादी बाबीवरु न सर्व नावे ठरविण्यात आली आहेत. तसेच मंडळाने सुध्दा यासर्व गोष्टींचा विचारकरुन नावाना मंजुरी दिल्याची माहिती आहे.महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या समितीने फुलपाखरांना मराठी नावे देण्यासाठी, तसेच ही नावे स्थानिक असल्यास ओळखण्यास अधिक मदत होईल. यासाठी नावे मराठी नावे पाठविण्याचे आवाहन केले होते.पूर्व विदर्भात आढळणाºया फुलपाखरांची दोन मराठी नावे आपण मंडळाकडे पाठविली होती. या नावांना मंडळाने मंजुरी दिली असून ‘कॉमन लेपर्ड’ या फुलपाखरास बिट्टी तर ‘स्मॉल लेपर्ड’ या फुलपाखरास छोटी बिट्टी अशी ओळख आता मिळणार आहे.- संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा.

टॅग्स :wildlifeवन्यजीव