शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांचा अस्थिकलश शुक्रवारी गोंदियात'

By admin | Updated: October 14, 2015 02:37 IST

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतात निलागिरी सेया नावाच्या भव्य स्तुपाच्या उत्खननातून एका सोन्याच्या पेटीसह तथागत बुद्धांचे दोन अस्थिधातू सुवर्ण कमळात आढळल्या.

गोंदिया : श्रीलंकेच्या पूर्व प्रांतात निलागिरी सेया नावाच्या भव्य स्तुपाच्या उत्खननातून एका सोन्याच्या पेटीसह तथागत बुद्धांचे दोन अस्थिधातू सुवर्ण कमळात आढळल्या. पुरातत्व खाते श्रीलंका व इतिहास संशोधकांच्या मतानुसार या अस्थिधातू तथागत बुद्धांच्या असून सम्राट अशोकाने धम्मप्रसारादरम्यान श्रीलंकेत पाठविले होते. या अस्थिधातू भारतीय बौद्ध महासभेच्या प्रयत्नाने विदर्भात दर्शनार्थ उपलब्ध होत आहेत. तसेच या अस्थिधातूंचे दर्शन घेण्याचे सौभाग्य शुक्रवार (दि.१६) रोजी गोंदिया जिल्हावासीयांना लाभणार आहे. शुक्रवारी (दि.१६) सकाळी ५ वाजता अस्थिधातू कलश साकोलीवरून गोंदियाकडे प्रस्थान, सकाळी ६ वाजता सौंदड येथे, सकाळी ७ वाजता सडक-अर्जुनी येथे, सकाळी ८ वाजता गोरेगाव येथे, ९ वाजता पवित्र अस्थिधातूंचे स्वागत सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या फुलचूर येथील कार्यालयाजवळ, ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शन व्यवस्था बुद्धिस्ट समाज संघ संथागार गोंदिया येथे, दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अस्थिंचे स्वागत आणि सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मैत्रेय बुद्धविहार भीमनगर (गोंदिया) येथे अस्थिधातू कलशाची दर्शन व्यवस्था होणार आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महापरित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शनिवार (दि.१७) हे अस्थिकलश बालाघाट (मध्य प्रदेश) येथे नेण्यात येणार आहे. या वेळी मार्ग भीमनगर-सिंगलटोली-सूर्याटोला-रामनगर-राजलक्ष्मी चौक-पाल चौक-कुडवा नाका व बालाघाट रोडवर सकाळी ८ वाजता समारोप होणार आहे.या वेळी श्रीलंका व विदेशातून आलेले सर्व भदंत व त्यांचा संघ उपस्थित राहणार आहे. तसेच दिल्लीचे भदंत चंद्रकीर्ती, भदंत संघधातू, नागपूरचे भदंत वननासामी, भदंत आनंद, भदंत लोकपाल, बालाघाटचे भदंत धम्मशिखर, केळझरचे आचार्य भदंत सोमानंद यांची मंगल उपस्थिती राहणार आहे. (प्रतिनिधी)