शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रांना भ्रष्टाचाराचे ग्रहण

By admin | Updated: June 23, 2014 23:57 IST

बारावीचे निकाल लागल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली आहे. आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

गोंदिया : बारावीचे निकाल लागल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली आहे. आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली आहे. जातीच्या दाखल्यांसह विविध कागदपत्रांमुळे सेतू कक्षात विद्यार्थी व पालकांची झुंबळ दिसून येत आहे. मात्र सेतू केंद्रामध्ये जनरेटरची व्यवस्था नसल्याने भारनियमनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणच्या सेतू केंद्रामध्ये भ्रष्टाचाराचे पेव फुटले आहे.
१२ वी हा शैक्षणिक जीवनातील महत्वपूर्ण टप्पा समजला जातो. बारावीनंतर आपल्या आवडीच्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी वाटचाल सुरू होते. बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला व निकालपत्रकांचेही वाटप झाले आहे. निकालपत्रक हातात पडल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान व आदी विभागाचे प्रवेश सुरू झाले आहेत. प्रवेशासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे लागत असतात. मेडीकल, इंजिनिअरिंगसह इतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांनादेखील अनेक कागदपत्रांची गरज भासते. बारावीचा निकाल लागल्यामुळे जवळजवळ सर्वांचेच पुढील नियोजन तयार झाले आहे. नुकताच सीईटीचा निकालही जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत ऐन प्रवेशाच्या वेळी कापदपत्रासाठी ओढताण होवू नये म्हणून तहसील आवारात कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी दिसून येत आहे. मे महिन्यात सुटी असल्यामुळे शांत झालेल्या तहसील कार्यालय जून महिना उजाडताना पुन्हा गजबजू लागला आहे.
शासनाने महसूल विभागाच्या विविध कामासाठी नागरिकांची धावपळ होवू नये म्हणून सेतू केंद्र उभारले. सदर सेतू केंद्र संस्थेच्या मार्फत चालविण्यात येत आहे. गोंदिया येथील सेतू केंद्रात चार संगणक लावण्यात आले आहेत. दोन कॅमेरे आहेत. परंतु चार संगणकावर काम न करता फक्त दोनच संगणकाचा वापर केला जात आहे. तर उर्वरित संगणक शोभेचे वस्तू म्हणून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रांसाठी तासनतास तातकळत विद्यार्थी व पालकांना उभे राहावे लागते.
एका कागदपत्रासाठी विद्यार्थी व पालकांना दोन-दोन दिवस सेतू केंद्राच्या हेलपाट्या माराव्या लागतात. एकीकडे प्रवेशाची घाई तर दुसरीकडे महसूल विभागाचा नाकर्तेपणा या दोन्ही बाबी विद्यार्थी व पालकांना भेडसावत आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली असून तहसील आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. अर्ज व्यवस्थित न भरल्यामुळे तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. यामुळे दलालांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी फी वर बंधन नसल्यामुळे १०० पासून तर ५०० रुपयांपर्यंत फी वसूल केली जात आहे. सेतू सेवा केंद्र हे जनतेच्या सोयीसाठी उभारण्यात आले असले तरी आज हे केंद्र जनतेच्या लुटीचे साधन ठरले आहे.
अधिकाऱ्यापासून तर वेंडरांपर्यंत सर्वच जण नागरिकांकडून पैसे उकाळण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या महाविद्यालयीन कागदपत्रांसाठी गर्दी असल्याने तहसील कार्यालयासह सेतू सेवा केंद्राला सुगीचे दिवस आले आहे. गर्दीचा फायदा उचलून शिपाई एकेका सहीसाठी ५० ते १०० रुपयांची मागणी करीत असून त्यांचा धंदा जोमात सुरू आहे.
दरम्यान, शिपायांच्या या दादागिरीची तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांच्या कागदपत्राला ब्रेक लावण्यात येतो. कमाईतील २५ टक्के रक्कम ही अधिकाऱ्यांना रीतसर पोहचत असल्याचे सूत्रांकडून कळले. बेरोजगार विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)