शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणकर यांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: June 14, 2014 01:25 IST

सालेकसा तालुक्यांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र

गोंदिया : सालेकसा तालुक्यांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वानखेडे यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने कंटाळलेल्या कारूटोला येथील संतोष ब्राम्हणकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सालेकसा तालुक्यातील कारूटोला येथील रहिवासी संतोष धनराज ब्राह्मणकर यांची पत्नी स्रेहा यांना प्रसुतीसाठी १५ एप्रिलच्या रात्री १२ वाजता सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य सेविका टेंभूर्णीकर यांनी स्रेहाची तपासणी केली. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय वानखेडे हे मुख्यालयात असूनही तपासणीसाठी आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता डॉ.वानखेडे यांनी तपासणी करून प्रसूती येथे सुखरूप व सुरक्षित होईल, असे आश्वासन दिले. सायंकाळी ७.३० वाजता संतोष ब्राह्मणकर डॉ. वानखेडे यांना बोलविण्यासाठी त्यांच्या क्वॉर्टरवर गेले, त्यावेळी डॉ. वानखेडे यांनी तुमची पत्नी येथे दाखल आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्या क्वॉर्टरमधून निघून जा. जो एमबीबीएस असेल तो तपासणी करेल. माझे काही काम नाही, असे बोलून क्वॉर्टरबाहेर हाकलून दिल्याचे ब्राम्हणकर यांचे म्हणणे आहे. यानंतर १६ एप्रिलच्या रात्री तपासणी करून गोंदियाला न्या, असे सांगितले. त्यामुळे ब्राह्मणकर आपल्या पत्नीला घेवून बाई गंगाबाई रूग्णालयात आले. रात्री साडेबारा वाजता आॅपरेशनद्वारे प्रसूती करण्यात आली. परंतु नवजात मुलगी पोटामध्येच मृत्यू पावली, असे डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूस व पत्नीची प्रकृती खालावण्यामागे डॉ.वानखेडे यांचे दुर्लक्ष व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोग ब्राह्मणकर यांनी केला आहे. यानंतर १६ ते २६ एप्रिलपर्यंत संतोष यांची पत्नी स्रेहा गंगाबाई रूग्णालयातच भरती होती. तरीसुद्धा प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या सर्व प्रकारासाठी सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय वानखेडे कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी व न्याय द्यावे, अशी मागणी संतोष ब्राह्मणकर यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास सपत्निक जि.प. गोंदियासमोर आमरण उपोषणावर बसू, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षक गोंदिया, गृहमंत्री आर.आर. पाटील, आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक मुंबई, जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया व जि.प.अध्यक्ष तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)