शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कामकाजावर बहिष्कार

By admin | Updated: October 14, 2015 02:34 IST

राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या कामावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे.

अर्जुनी-मोरगाव : राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या कामावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. अशैक्षणिक कामाला उच्च न्यायालय मुंबई यांची स्थगिती असल्यामुळे प्रगणकाचे साहित्य परत करण्याचे निवेदन संघटनांच्या वतीने तहसीलदारांंना शनिवारी देण्यात आले. राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. तालुकास्थळी याचे साहित्य आलेले आहे. याकामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी सुरू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जात आहे. या कामकाजामुळे शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे म.रा. प्राथमिक शिक्षक समिती व शिक्षक संघाच्या संघटनांनी राज्य व जिल्हा स्तरावरून या कामाचा विरोध करून बहिष्कार घातला आहे. तसे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहेत. उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयाप्रमाणे अशैक्षणिक कामाला स्थगिती देण्यात आली. मात्र सातत्याने शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा लादला जात आहे. याचा विरोध म्हणून या कामकाजावर बहिष्कार घालण्यासाठी शनिवारी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ खोब्रागडे, डी.एल. कोकोडे, कैलास हाडगे, मनोहर नाकाडे, श्रीकृष्ण कहालकर, रमेश संग्रामे, अशोक दिवटे, दिलीप लोधी, रमेश गहाणे, पी.के. लोथे, अरविंद नाकाडे, एस.एल. ब्राम्हणकर, अंजिता मेंढे, मनोहर मोटघरे, विनोद बडोले, आशिष कापगते, मोहन नाकाडे, जगदिश नाकाडे यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)