बोअरवेल खोदणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:35+5:30

बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्यांच्याकडून पैसे हिसकावले. त्यांच्या बॅगमध्ये फक्त २ हजार रूपये होते.

Borewell diggers were robbed at gunpoint | बोअरवेल खोदणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटले

बोअरवेल खोदणाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर लुटले

Next
ठळक मुद्देचौघांना अटक । वाहनातील कॅमेऱ्याने आरोपींचे चित्र टिपल्याने फुटले बिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील शिलापूर येथील पुलाजवळ १३ मे च्या रात्री ८.३० वाजता चाकू व बंदुकीच्या धाकावर बोअरवेल खोदणाऱ्या मजुरांना २ हजार रुपयांनी लुटल्याची घटना घडली. या संदर्भात देवरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तामीळनाडूच्या नामकल जिल्ह्यातील आधीथीर चित्तलंगूर त्रिच्चेगोड हे देवरी तालुक्याच्या पुराडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात १३ मे रोजी बोअरवेल खोदायला गेले. बोअरवेल खोदणारा ऑपरेटर, ड्रायव्हर व ८ मजूर असे दहा लोक त्या ट्रकने येत असताना दोन मोटारसायकलवर बसून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आपले वाहन समोर नेले. त्यानंतर रस्त्यावर मोटारसायकल उभे करून त्यांना अडविले. चाकू, बंदूक दाखवून त्यांच्याकडून पैसे हिसकावले. त्यांच्या बॅगमध्ये फक्त २ हजार रूपये होते.
२५ वर्ष वयोगटातील ते आरोपी असल्याचे सांगितले जाते. त्या सर्वांचे छायाचित्र बोअरवेलच्या ट्रकला लावलेल्या कॅमेºयात कैद झाले. देवरी पोलिसांनी त्या चौघांवर भादंविच्या कलम ३९४, ३४१ सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना देवरी पोलिसांनी अटक केली आहे. देवरी ते शिलापूर हे पाच ते सहा किलो मिटरचे अंतर आहे. या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्याची माहिती तक्रारकर्त्यांनी वेळीच पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. आधी चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज पाहिले, गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोहचल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींपर्यंत पोलीस पोहचले नसते तर गुन्हा दाखल झाला नसता काय असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणात देवरी पोलिसांनी आशिष युगलकुमार शर्मा (२२) रा. वॉर्ड क्रमांक १४ देवरी, आकाश युगुलकुमार शर्मा (२२) रा. वॉर्ड क्रमांक १४ देवरी, सचिन हेमराज मेश्राम (२५) रा.भागी, सौरभ बाळकृष्ण गायधने (२०) रा. मुरदोली ता. देवरी या चौघांना अटक केली आहे.

Web Title: Borewell diggers were robbed at gunpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी