शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र’ची हद्द गोंदियापर्यंतच

By admin | Updated: November 26, 2015 01:36 IST

गेल्या १९ वर्षांपासून गोंदियाशी ऋणानुबंध जुळलेली ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ आता छत्तीसगडमधील दुर्गपर्यंत विस्तारित ...

रेल्वेची स्पष्टोक्ती : दुर्गवरून सुटणार नसल्याची ग्वाहीगोंदिया : गेल्या १९ वर्षांपासून गोंदियाशी ऋणानुबंध जुळलेली ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ आता छत्तीसगडमधील दुर्गपर्यंत विस्तारित करण्याच्या अफवांमुळे गोंदियावासीयांमध्ये चांगलाच असंतोष पसरला होता. मात्र याबाबतचे वृत्त हे निराधार असून तसा कोणताही निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला नाही, असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनचे जनसंपर्क अधिकारी संतोष कुमार यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांपासून काही वृत्तपत्रांसह सोशल मिडियावर महाराष्ट्र एक्स्प्रेस आता गोंदियाऐवजी दुर्गवरून सोडली जाणार असल्याचे वृत्त पसरत आहे. गोंदिया ते कोल्हापूर अशी महाराष्ट्राची दोन टोकं जोडणारी ही गाडी दररोज गोंदिया आणि कोल्हापूर येथून सुटते. दररोज सकाळी ८.२० ला ही गाडी सकाळी गोंदियावरून सुटते त्याच वेळी राखीव कोटा सोडून इतर बहुतांश जागा पूर्ण भरलेल्या असतात. साधारण कोचमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे नागपूर पर्यंत या गाडीतील स्लिपर कोचमध्येही बसण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत दुर्गवरून ही गाडी सुरू केल्यास गोंदियाला येईपर्यंत ही गाडी आधीच भरलेली राहून गोंदियातील प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. त्यामुळे ही गाडी दुर्गवरून सुटेल या कल्पनेनेच गोंदियावासीयांमध्ये संतापाची लाट पसरली होती.बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तात रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाला देत महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुर्गपर्यंत विस्तारीत करण्याबाबत कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दुपारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र एक्स्प्रेस दुर्गवरून धावण्यासंबंधी कोणताही निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला नसल्याचे स्पष्ट केले. असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत नागरिकांना आधीच कळविले जाईल, असेही रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संतोष कुमार यांनी स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)