शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून बंद आहे बोगाटोलाची जि.प. शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

चिचगड केंद्रातील बोगाटोला या वस्तीत १ ते ४ पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत पटसंख्या फक्त चार आहे. पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. दुसऱ्या वर्गात दोन, तिसऱ्या व चवथ्या वर्गात प्रत्येकी एक असे एकूण चार विद्यार्थी या शाळेत आहेत. या सत्रापासून २० जानेवारीपर्यंत यू.एम. उईके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष : चारही विद्यार्थी बसतात अंगणवाडीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असलेल्या भागातील ग्राम बोगाटोला येथील शाळेत महिनाभरापासून शिक्षक उपलब्ध नसल्याने त्या शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. शाळेला कुलूप असल्याने त्या चारही विद्यार्थ्यांना गावातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत बसावे लागत आहे.चिचगड केंद्रातील बोगाटोला या वस्तीत १ ते ४ पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत पटसंख्या फक्त चार आहे. पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. दुसऱ्या वर्गात दोन, तिसऱ्या व चवथ्या वर्गात प्रत्येकी एक असे एकूण चार विद्यार्थी या शाळेत आहेत. या सत्रापासून २० जानेवारीपर्यंत यू.एम. उईके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले.परंतु बोगाटोलापासून अवघ्या ३ किमी. अंतरावर असलेल्या ग्राम सुंदरी येथे विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना प्रतिनियुक्तीवर ग्राम सुंदरी येथे पाठविण्यात आले.सुंदरी येथे कार्यरत असलेले शिक्षक गुट्टे हे विद्यार्थ्यांना शिकवित नाही. म्हणून गावकऱ्यांची तीन-चार वेळा तक्रार असल्यामुळे त्यांना तेथून बोगाटोला येथे हलविले. त्यात एक शिक्षक गेले आणि दुसरे शिक्षक आले. परंतु यात सर्वाधीक नुकसान विद्यार्थ्यांचे झाले आहे. मागील महिनाभरापासून बोगाटोलाची शाळा बंद असल्याची ओरड गावकऱ्यांची आहे.बोगाटोलापासून पाऊलझोला येथील शाळा २ किमी. तर सुंदरी येथील शाळा ३ किमी. अंतरावर आहे. बोगाटोला शाळेचे शिक्षक सुंदरीला पाठविले तेव्हाच या चारही विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबतच पाऊलझोला किंवा सुंदरी येथील शाळेला जोडले असते तर महिनाभरापासून या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नसते.बोगाटोलाचे शिक्षक न सांगता गेले. शुक्रवारी त्यांच्या भावाचा त्यांची प्रकृती बरी नाही असा फोन आला. मी एक शिक्षक असून माझ्याकडे केंद्रप्रमुख हा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे भेट होणे शक्य नाही. उद्या भेट देऊन विचारपूस करतो.-युवराज कोल्हारेकेंद्रप्रमुख चिचगड ता. देवरी.विद्यार्थ्यांचे डिमोशनमहिनाभरापासून बोगाटोला येथील शाळा बंद असल्याने त्या शाळेतील चारही विद्यार्थी गावातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत बसतात. म्हणजेच, वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी पुन्हा डिमोशन होऊन अंगणवाडीत बसत आहेत. महिनाभरापासून आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे.

टॅग्स :Schoolशाळा