शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा ठेव परत न करणाऱ्या एमआयडीसीला चपराक

By admin | Updated: November 20, 2014 22:54 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार

ग्राहक मंचचा निर्णय : २९ हजार रुपये व्याजासह द्यावेगोंदिया : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. यावर न्यायमंचाने दोन्ही पक्षांच्या सबबी एकूण सदर महामंडळाने ग्राहकाला नऊ टक्के व्याजासह २९ हजार ८१५ रूपये देण्याचे आदेश दिले.प्रमोद अग्रवाल हे राईस मिलचे मालक आहेत व औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील राईस मिलच्या आवारात असलेल्या सदनिकेत राहतात. तेथील कर्मचाऱ्यांना सदर महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जातो. शिवाय अग्रवाल यांचे कार्यालयसुद्धा त्याच परिसरात असल्याने ते स्वत:साठी व इतर लोकांसाठी पाण्याचा वापर करतात. मात्र मिल बंद झाल्यामुळे तेथील कर्मचारी इतरत्र गेले व डिसेंबर २०१२ मध्ये पाणी पुरवठा बंद झाला. अग्रवाल यांनी वेळोवेळी पाणी पुरवठ्याच्या जोडणीच्या सुरक्षा ठेवी एकूण २९ हजार ८१५ रूपये भरले. यानंतर ९ डिसेंबर २०१२ रोजी सुरक्षा ठेव परत मागितले. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच अग्रवाल यांना रदर रक्कम परत देण्यात येईल, असे सांगून न देण्याचे कसलेही कारण सांगितले नाही. ग्राहक न्यायमंचने आपल्या कारणमिमांसेत सदर महामंडळ व्यवसायाकरिता पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी सुरक्षा ठेवी भरल्याच्या पावत्यांची तपासणी केली. सुरक्षा ठेव परत करण्यासंबंधीचे महामंडळाचे अग्रवाल यांना पाठविलेले पत्र, नवीन भूखंडावरील नवीन नळ जोडणीसाठी नव्याने सुरक्षा ठेवीचे महामंडळाचे पत्र व सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे मंजुरी व शोधनासाठी सादर करण्यात आल्याचे अग्रवाल यांना कळविले. त्यावरून सुरक्षा ठेव अद्याप परत करण्यात न आल्याचे सिद्ध झाले. शिवाय अग्रवाल यांनी सदर महामंडळाकडे सुरक्षा ठेव परत मिळण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लेखी व तोंडी विनंत्या व त्याविषयीचे पत्र आदी बाबींवरून महामंडळाच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावरून ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी पुरवठ्याची सुरक्षा ठेव २९ हजार ८१५ रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने रक्कम मिळेपर्यंत द्यावे, शिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये द्यावे, आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे असा आदेश दिला आहे.(प्रतिनिधी)