शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विपरित परिस्थितीवर मात करीत बिरसीच्या अजयची भरारी

By admin | Updated: June 18, 2014 00:15 IST

पोटाची खळगी भरण्याच्या लगबगीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परंतु पोटाची आग विझवित शाळेतही नेत्रदीपक कामगिरी करणे एखाद्यालाच जमते करतो. घरात असलेल्या अठराविश्व दारिद्रयावर मात करीत

नरेश रहिले - गोंदिया
पोटाची खळगी भरण्याच्या लगबगीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. परंतु पोटाची आग विझवित शाळेतही नेत्रदीपक कामगिरी करणे एखाद्यालाच जमते करतो. घरात असलेल्या अठराविश्व दारिद्रयावर मात करीत दहावीसारख्या बोर्डाच्या परीक्षेत ८३.४० टक्क्यांपर्यंत गुणांची मजल मारणाऱ्या आमगाव तालुक्यातील बिरसी येथील अजय राजकुमार सोनवाने याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल आमगाव येथे शिकत असलेला हा हा गरीब कुटूंबातील मुलगा आहे. त्याचे आई-वडील मोलमजूरी करून संसार चालविण्याचा खटाटोप करतात. परंतु वाढत्या महागाईमुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे आई-वडीलांना हातभार लावण्याच्या हेतूने अजयने मागील एक-दीड वर्षापासून आमगाव येथील वैशाली मेडीकल दुकानात पार्टटाईम नोकरी स्वीकारली. शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर औषधी दुकानात काम करून मिळालेल्या पैशातून शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, उर्वरीत पैसे घर चालविण्यासाठी आई-वडीलांना देणे हे त्याचे काम होते. वडील राजकुमार व आई पुस्तकला हे दोघेही मोलमजूरी करून आपला संसार सुखी करण्याचे स्वप्न पहात आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आई-वडीलांच्या कामात हातभार लागेल, या आशेने अजयने अर्धवेळ नोकरी पत्करली. सकाळी ५ वाजता उठणे, त्यानंतर अभ्यास करणे, सकाळी ९ ते ११ वाजतादरम्यान औषधी दुकानात कामाला जाणे त्यानंतर शाळेच्या वेळात शाळेत जाणे, शाळेतून सुट्टी झाल्यावर रात्री आठ वाजतापर्यंत पुन्हा औषधी दुकानात जाणे व रात्री अभ्यास करणे हा त्याचा नित्यक्रम होता. शाळेतील वेळ तो वाया घालवित नसे. यामुळे अजयने ८३.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला.