शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गादबोडीचे खोलीकरण सुरू

By admin | Updated: April 23, 2017 01:47 IST

गावातील मजुरांना गावामध्येच काम उपलब्ध करुन देऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटावा या हेतूने

रोजगार हमी योजना ठरली वरदान : ७०० मजुरांच्या हातांना मिळाले काम बोंडगावदेवी : गावातील मजुरांना गावामध्येच काम उपलब्ध करुन देऊन त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटावा या हेतूने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. उन्हाची दाहकता तीव्र असली तरी ‘ पोटासाठी वाटेल ते’ यानुसार गावातील शेकडो मजुरांनी शनिवारी (दि.२२) रोहयोच्या कामावर हजेरी लावून गादबोडीच्या खोलीकरणाचा शुभारंभ केला. या कामावर ७०० मजूर काम करीत असून विशेष म्हणजे पहिल्या दिवशी पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती दुप्पटीने जास्त दिसत होती. ग्रामपंचायतच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील रोजगार हमी योजनेच्या सुरू झालेल्या कामावर पहिल्याच दिवशी मजुरांची विक्रमी उपस्थिती दिसून आली. गावातील गट नंबर १६१ मधील गादबोडीच्या खोलीकरणाचे काम रोहयोच्या माध्यमातून करण्याचा शुभारंभ करण्यात आला. रोहयोच्या कामाची मागणी करण्यासाठी गावातील एक हजार सात मजुरांच्या नावाची नोंदणी करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर यांनी दिली. सदर बोडीच्या खोलीकरणाच्या कामावर १५ लाख ९८ हजार २४० रुपयांचा निधी खर्चीला जाणार असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. तळपत्या उन्हाने जिवाची लाई-लाई होत असून सुद्धा गादबोडी खोलीकरणाच्या कामावर पहिल्याच दिवशी २४२ पुरुष व ४६१ महिला असे ७०३ मजूर काम करीत असल्याचे ग्राम रोजगार सेवक सचिन नाकाडे यांनी सांगितले. सदर बोडी खोलीकरणाच्या कामामुळे गावातील समस्त लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या कामामुळे गावातील मजुरांना गावामध्ये रोजगाराची संधी मिळाली. बोडी खोलीकरणामुळे तलावातील पाण्याच्या जलसिंचित साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार यात शंका नाही. सदर बोडीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढल्यास जवळच्या शेतकऱ्यांना धान उत्पादन व ईतर पिकांसाठी सहजरित्या पाणी उपलब्ध होणार अशी शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे. त्याचबरोबर भोई समाज बांधवांना तलावात मत्स्यव्यवसाय करण्यासाठी संधी सुद्धा मिळू शकते. (वार्ताहर) रोजगार हमीच्या कार्याला ‘प्रथम’ पसंती गावागावात सुरू होणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामाला गावकरी प्रथम पसंती देत असल्याचे रोहयोच्या मजुरांच्या विक्रमी उपस्थितीवरुन सर्वत्र दिसून येत आहे. रोहयोच्या कामाच्या ठिकाणी फेरफटका मारला असता कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य कामाच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले. बारमाही रोजी करणारा त्या कामावर तर दिसलाच परंतु जे कोणी घरच्या कामाशिवाय इतर कामाला शिवत नाही, अशांची संख्या नजरेत भरणारी दिसत होती. काही हौशीखातर म्हणूनही आपली हजेरी लावण्याचा प्रकार करीत असल्याची कुजबुज ऐकायला मिळत होती. लोकांची रोहयोच्या कामाला प्रथम पसंती दिसते.