शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अंगात भूत येणे मानसिक आजार- प्रकाश धोेटे

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

अंगात भूत, देवी-देवता येणे अशा घटना समाजात घटत असतात. विशेष सण, उत्सव व नवरात्र इत्यादी दरम्यान हे नेहमी बघावयास मिळते.

सालेकसा : अंगात भूत, देवी-देवता येणे अशा घटना समाजात घटत असतात. विशेष सण, उत्सव व नवरात्र इत्यादी दरम्यान हे नेहमी बघावयास मिळते. परंतु अंगात कोणालाही भुत येत नाही, किंवा देवी-देवता सुद्धा येत नाही. ज्याच्या अंगी असे घडून येते तो मानसिक आजाराने ग्रस्त असतो असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश धोटे यांनी केले.येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, तलाठी व ग्रामसेवकांच्या कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना धोटे यांनी, अंगात भुत येणे, त्याला तंत्रमंत्राने भगविणे व झाडफुकाचे उपचार करणे हा सर्व ढोंगी बुवा व तथाकथीत चमत्कारी बाबांचा समाजघातकी व्यवसाय आहे. ही फक्त एक अंधश्रद्धा असून काही लोक नेहमी समाजात अंधश्रद्धा पसरवून ठेवतात आणि भोळ्या भाबड्या लोकांची लुबाडणूक करीत असतात. करिता चमत्कार व जादूसारख्या गोष्टींवर आपला वेळ आणि पैसा खर्च करु नये. जो या गोष्टींमध्ये राहिला तो आपल्या कुटूंबाला उध्वस्त करुन बसला असल्याचे सांगीतले. तसेच काही लोक समजतात की माणूस मेल्यावर त्याचा आत्मा भटकतो आणि त्याला जीवंतपणी त्रास देणाऱ्याला सतावत असतो. जर असे झाले असले तर लोक रोज कोंबळे, बकरे इत्यादी जीवांची हत्या करुन भक्षण करीत असतात. त्यांची आत्मा आपला सूड घेतल्याशिवाय राहिली नसती. लिंबूतून रक्त काढणे, नारळातून वित्रिच वस्तू बाहेर काढणे, पाण्याचे दिवे जाळणे इत्याची चमत्कार दाखविणारे ढोंगी बाबा आपल्या हात चलाखिने लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्नात यशस्वी होतात आणि लोकभ्रमीत होऊन त्यांच्या भ्रमजाळात अडकून बसतात. या संधीचा गैरफायदा घेत ढोंगी बाबा लोकांची आर्थिक, शारिरीक पिळवणूक करीत असतात. एवढेच नाही तर मुल होत नसलेल्या महिलेची फसणवूक करुन तिच्यावर शारीरिक अत्याचार सुद्धा करित असतात. म्हणून महिलांनी अशा ढोंगी बाबापासून नेहमी सावध राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मार्गदर्शन प्रसंगी सभापती हिरालाल फाफनवाडे, उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, बीङीओ यशवंत मोटघरे, विस्तार अधिकारी यु.टी. राठोड, विजय मानकर, गणेश भदाडे, विस्तार अधिकारी उके व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रेला, मधु हरिणखेडे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)