शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना प्रेम व सहकार्य आवश्यक

By admin | Updated: April 19, 2015 00:51 IST

जिल्हाधिकारी म्हणून काम करताना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्यावर भरभरुन प्रेम केले आणि तेवढेच सहकार्य सुद्धा दिले.

निरोप समारंभ : अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे आयोजनगोंदिया : जिल्हाधिकारी म्हणून काम करताना येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्यावर भरभरुन प्रेम केले आणि तेवढेच सहकार्य सुद्धा दिले. समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाची महत्वाची भूमिका पार पाडली. काम चांगले करण्यासाठी हे प्रेम व सहकार्य असणे अधिकाऱ्यांसाठी आवश्यक असते, ते मी विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार स्थानांतरित जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी काढले.गोंदिया जिल्हा अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने डॉ.सैनी यांची कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर गोंदियात त्यांचा निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात डॉ. सैनी बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, भंडारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक संजय ठवरे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विजय केवलिया, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.दीपक बाहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी अधिकारी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते होते.डॉ.सैनी पुढे म्हणाले, समन्वय समितीने समन्वयाची भूमिका भविष्यातही पार पाडावी. आज माझा झालेला सत्कार पाहून मी भारावून गेलो असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विलास निखारे, लोखंडे, भवरे, साबळे, शिक्षणाधिकारी खंडागळे, उपविभागीय अधिकारी एन.के. राव, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिरे, देवरीचे राजमाने, देवरे, वाघचौरे सुधीर कार्लेकर, जयपुरिया, गुजर, अविनाश काळदाते, किरण कबाडी उपस्थित होते. यावेळी डॉ.संदीप पखाले, दिलीप गावडे, डॉ.दीपक बाहेकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समन्वय समितीचे जिल्हा सचिव दुलीचंद बुद्धे यांनी संचालन डी.यु. रहांगडाले यांनी तर आभार कार्यकारी अभियंता संजय कटरे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)