शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील आरोग्य सेवेत आशांचा वाटा महत्त्वाचा

By admin | Updated: February 7, 2015 23:27 IST

आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यात आशा सेविकांचा महत्वाचा वाटा आहे, असे मत गटप्रवर्तक दिप्ती ब्राम्हणकर यांनी व्यक्त केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात

सालेकसा : आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यात आशा सेविकांचा महत्वाचा वाटा आहे, असे मत गटप्रवर्तक दिप्ती ब्राम्हणकर यांनी व्यक्त केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविकांसाठी आयोजित हळदीकुंकू व मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख एस.के. दोनोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एल.जी. निपाणे, आरोग्य सेविका योगिता वावरे, राखी प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आशा सेविका व आरोग्य सेविकांना हळदी कुंकू व भेट वस्तू देण्यात आल्या. मार्गदर्शन शिबिरात पाहुण्यांनी आरोग्य सेवेविषयी मत व्यक्त केले.यात सालेकसा तालुक्यातील कावराबांध ते दरेकसा आरोग्य केंद्रांतर्गत आदिवासी, दुर्गम, डोंगराळ व जंगल व्याप्त गावांत आशा सेविका कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांची आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका असल्याचे मत दोनोडे यांनी व्यक्त केले. तसेच सालेकसा तालुका सारख्या दुर्गम भागातून प्रसुतीसाठी महिलांना आरोग्य केंद्रात आणणे कठिण कार्य आहे. पण आशांच्या प्रयत्नामुळे या भागात प्रसुती संदर्भात आता जागृती निर्माण झाली असून प्रसुतीचा उच्चांक गाठता येत आहे, असे मत निपाणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरण करुन करण्यात आली. संचालन चंद्रकला ठेकवार यांनी केले. आभार लिला दमाहे यांनी मानले. याप्रसंगी चंद्रकला नागपूरे, गीता धामडे, अनिता सिरशाम, अनिता साखरे, उषा दमाहे, उषा लिल्हारे, पुष्पा लिल्हारे, सरिता मानकर, ममता रसोने, सविता भसारे, चंपा पंधरे, निषा टेंभरे अहिल्या लिल्हारे, रेखा गडघाते, सरिता मेश्राम, सुशिला लिल्हारे मोठ्या संख्येत आशा सेविका उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)