यंत्रातील आवाज पळवून लावणार जनावरांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:16+5:30

एकॉस्टिक डिवाईस नामक यंत्र बाजारपेठेत सहज उपलब्ध असून त्याची किमत सुध्दा फार नसल्याने त्याची खरेदी करणे शेतकऱ्याच्या आवाक्यात आहे. शेतात पाच फूट उंचीवर हे यंत्र लावणे शक्य आहे. यामुळे वन्यप्राणी आणि जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

Animals will emit noise from the device | यंत्रातील आवाज पळवून लावणार जनावरांना

यंत्रातील आवाज पळवून लावणार जनावरांना

Next
ठळक मुद्देपिकांचे नुकसान टाळण्यास होणार मदत : शेतकऱ्यांची समस्या दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना नेहमी वन्यप्राणी आणि जनावरांकडून होणाºया पिकांच्या नासधुसीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष सुध्दा वाढत आहे. त्यामुळे होणारे नुकसान आणि संघर्ष टाळण्यासाठी एकॉस्टिक डिव्हाईस हे यंत्र उपलब्ध झाले आहे.या यंत्रातील आवाजामुळे जनावरांना पळावून लावणे शक्य होणार आहे.
एकॉस्टिक डिवाईस नामक यंत्र बाजारपेठेत सहज उपलब्ध असून त्याची किमत सुध्दा फार नसल्याने त्याची खरेदी करणे शेतकऱ्याच्या आवाक्यात आहे. शेतात पाच फूट उंचीवर हे यंत्र लावणे शक्य आहे. यामुळे वन्यप्राणी आणि जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. हे यंत्र २०० मीटर अंतरापर्यंत काम करते. हे यंत्र पाच ते सहा फूट अंतरावर लावता येऊ शकते. तर दुसऱ्या यंत्राचे अंतर हे ११० मीटर असते. यामुळे जवळपास २५० अंतरापर्यंत हे यंत्र काम करते. या यंत्रासमोर कॅमेरा आणि जाळी सुध्दा लावता येते. यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती मिळण्यास मदत होते. जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कन्हारटोला, मोहघाट जवळील शेतांमध्ये या यंत्राचा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राणी आणि जनावरांपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे.
फॉक्स लाईटचा सुद्धा उपयोग
एकॉस्टिक डिव्हाईस प्रमाणेच एक फॉक्स लाईट सुध्दा असून हे सुध्दा आवाज करणारे यंत्र म्हणून ओळखले जाते. शेतात प्रत्येकी ५० फूट अंतरावर ४ ट्रांसेक्ट लावून २०० फूट अंतरापर्यंत हे फॉक्स लाईट काम करतात. या यंत्रामुळे सुध्दा जनावरांपासून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते.
काय आहे एकॉस्टिक डिव्हाईस
एकॉस्टिक डिव्हाईस हे एक आवाज करणारे यंत्र आहे. या यंत्रातून विविध जनावरांचे आवाज निघतात. विशेष म्हणजे जनावरे जेव्हा शेताच्या परिसरात प्रवेश करतात तेव्हा या यंत्रातून आवाज निघतो. त्यामुळे जनावरे पळ काढतात. हे यंत्र सौर ऊर्जेवर चालत असल्याने विजेची सुध्दा गरज नाही. या यंत्राची किमत २५ हजार रुपये आहे.

Web Title: Animals will emit noise from the device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी