शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेला वार्षिक स्नेह संमेलनाची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

नगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच नाही. परिणामी सन २०१७ व २०१८ मध्ये वार्षिक स्नेह संमेलन झालेच नाही.

ठळक मुद्देयंदाचे तिसरे वर्ष : आर्थिक टंचाईचे कारण

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ म्हणजेच शाळांमधील वार्षिक स्नेह संमेलन होय. मात्र येथील नगर परिषदेला विद्यार्थ्यांच्या कला गुणांशी काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते. मागील २ वर्षांपासून नगर परिषद शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन झालेले नसून यंदाचे तिसरे वर्ष आहे. यामागे आर्थिक टंचाईचे कारण सांगीतले जात असून अन्यत्र लाखो रूपयांचा चुराडा होत असतांना विद्यार्थ्यांसाठीच पैशांची टंचाई असते काय असा सवालही आता केला जात आहे. यातून मात्र नगर परिषदेला वार्षीक स्नेह संमेलनाची ‘अ‍ॅलर्जी’ दिसून येत आहे.वर्षभर अभ्यास करतानाच काही दिवस विद्यार्थीच काय शिक्षकांचेही मनोरंजन व्हावे या दृष्टीने वार्षिक स्नेह संमेलन लाभदायी आहे. स्नेहसंमेलनातंर्गत क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा व कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना आपल्यातील कला व गुणांना सादर करण्याची संधी मिळते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे एक माध्यम म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन असल्याचेही बोलले जाते. मात्र नगर परिषदेला विद्यार्थ्यांच्या कला गुणांशी काहीच घेणे देणे नाही. यामुळेच मागील २ वर्षांपासून येथील नगर परिषदेच्या शाळांत वार्षिक स्नेहसंमेलन झालेले नाही. अशात नगर परिषद शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमधील कला व गुणांना वाव कसा मिळेल असा प्रश्न केला जात आहे. नगर परिषदेतील आर्थिक टंचाईचे कारण सांगीतले जात आहे. मात्र नगर परिषदेत अशी कशी आर्थिक टंचाई आली आहे की, ज्यामुळे मागील २ वर्षांपासून वार्षिक स्नेहसंमेलन घेता आले नाही असा सवाल आता विद्यार्थी व पालक आणि नगर परिषद सदस्य व कर्मचारी करीत आहेत.एकीकडे आपल्या शाळा चालविण्यासाठी नगर परिषद शाळांतील शिक्षक लोकांच्या घरी जाऊन विविध प्रकारचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र त्याच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकडे मात्र चक्क दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत असल्याचे पालकही बोलत आहेत. विशेष म्हणजे, नगर परिषदेच्या शाळा याच कारणांमुळे खाजगी शाळांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.विनाकारण लाखो रूपये खर्च केले जात असताना नगर परिषद मात्र विद्यार्थ्यांच्या करमणूक व त्यांच्यातील कला गुणांच्या विकासावर मोजके पैसे खर्च करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. शैक्षणिक सत्र लोटत असताना विद्यार्थ्यांना साहीत्य पुरविण्यात आले नाही. यातून नगर परिषद शाळांप्रती किती सजग आहे याचीही प्रचिती येते. तर फक्त आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी सत्राच्या शेवटी साहीत्य पुरवठा करण्याचा घाट रचणारेही याच नगर परिषदेत बसून आहेत ही मात्र खेदाची बाब आहे.फक्त १.५० लाखांचा खर्चनगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच नाही. परिणामी सन २०१७ व २०१८ मध्ये वार्षिक स्नेह संमेलन झालेच नाही. त्यात आता सन २०१९ मध्येही आतापर्यंत व काहीच हालचाली दिसून येत नाहीत. यावर्षीही नगर परिषद शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचा मुहूर्त नसल्याचे दिसत आहे.क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात माघारखाजगी शाळा आज प्रत्येकच क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात भाग घेत असून आपल्या विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करवून घेत आहेत. हेच कारण आहे की, खाजगी शाळांतील विद्यार्थी क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात वाखाणण्याजोगी कामगिरी करीत असून शाळेसह आपल्या शहर व पालकांचे नाव उंचावित आहेत. नगर परिषदेला मात्र काहीच घेणे देणे नसल्याने नगर परिषद शाळांतील शिक्षकही शाळेत या वर्ग घेऊन परत जा एवढाच रूटीन धरून आहेत. यामुळे मात्र अंगी कला व गुण असलेले नगर परिषद शाळांतील विद्यार्थी माघारत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका