शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकासह चौघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

आमगाव : पोलीस कोठडीत आरोपीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी येथील तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांची भंडारा कारागृहात गुरुवारी रवानगी करण्यात आली. ...

आमगाव : पोलीस कोठडीत आरोपीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी येथील तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांची भंडारा कारागृहात गुरुवारी रवानगी करण्यात आली. आरोपी मृत्यूप्रकरणी सीआयडी तपासातून पाच कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुंभारटोली येथील जिल्हा परिषद शाळेतील साहित्य चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी राजकुमार अभयकुमार धोती (वय ३०) यांच्यासह सुरेश धनराज राऊत, राजकुमार गोपीचंद मरकाम या तिघांना अटक केली होती. २१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना आमगाव पोलीस ठाण्याला सोपविले. त्यापैकी राजकुमार धोती याचा २२ मे रोजी सकाळी सव्वापाचच्या सुमारास पोलीस कोठडीत मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस शिपाई यांना तडकाफडकी निलंबीत केले होते. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले. पोलीस कोठडीत मारहाण प्रकरणातील तपासात पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांवर २७ मे रात्री ८.४५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उईके, दतात्रय कांबळे यांच्याविरोधात भादंवि कलम ३०२, ३३०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव फरार झाल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. अखेर मंगळवारी त्यालाही अटक करण्यात आली. तथापि, गुरुवारी आरोपी पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उईके, दत्तात्रय कांबळे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.