शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आकाश व दीपिका ठरले जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: June 18, 2014 00:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याने ८६.९० टक्के गुण घेऊन नागपूर

गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याने ८६.९० टक्के गुण घेऊन नागपूर विभागात दुसरा क्रमांक पटकावला. गोंदियातील विवेक मंदिर स्कूलच्या आकाश नितीन कोतवाल आणि दीपिका दामोधर वाघमारे यांनी ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
गोंदियातील रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या (बंगाली स्कूल) अभिषेक रहांगडाले याने ९६.६० टक्के गुण घेत द्वितीय तर आमगावच्या आदर्श विद्यालयाची पूनम तुरकर ही ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तिसरी आली आहे.
जिल्ह्यात २२ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २२ हजार ८८२ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. त्यात १९ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.०३ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.७२ टक्के आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २४३३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. ७८२१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८७९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १७५१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात एकूण २९५ शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेले बसले होते. त्यात ११ हजार ३२३ विद्यार्थी आणि ११ हजार ५५९ विद्यार्थिनी होत्या. एकूण २२ हजार ८८२ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते. त्यातून ९ हजार ५९३ विद्यार्थी आणि १० हजार २९१ विद्यार्थिनींना मिळून एकूम १९ हजार ८८४ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.७२ तर उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी ८५.३९ आहे. यावर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी जास्त संख्येने उत्तीर्ण होऊन आपली परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे यावर्षी बारावीच्या निकालात गोंदिया जिल्हा नागपूर विभागात पहिला होता. आता दहावीत विभागात दुसरा असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)