प्रशासनच म्हणतो ; होतेय कोरोना रूग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:14+5:30

पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याच ठिकाणी वेगवेगळ्या वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले. परंतु क्रीडा संकुलात कोरोना रूग्णांची गैरसोय होत असल्याचे स्वत: प्रशासनाचे अधिकारी मान्य करीत आहेत. कोरोना रूग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता धोक्यात असल्यामुळे त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे.

The administration says; Inconvenience to Hotey Corona patients | प्रशासनच म्हणतो ; होतेय कोरोना रूग्णांची गैरसोय

प्रशासनच म्हणतो ; होतेय कोरोना रूग्णांची गैरसोय

Next
ठळक मुद्देकाम करण्यास डॉक्टरांचा नकार : नियमीत डॉक्टरांना मुभा कंत्राटी डॉक्टरांना धरले वेठीस

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असताना आरोग्य यंत्रणा ठोस उपाय योजना करीत नाहीत. क्वारंटाईन करण्यात आलेले लोक आणि पॉझिटिव्ह रूग्ण अनेक दिवस एकत्र फिरले. पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याच ठिकाणी वेगवेगळ्या वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले. परंतु क्रीडा संकुलात कोरोना रूग्णांची गैरसोय होत असल्याचे स्वत: प्रशासनाचे अधिकारी मान्य करीत आहेत. कोरोना रूग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता धोक्यात असल्यामुळे त्यांनी काम करण्यास नकार दिला आहे.
कोरोना संसर्गात रेड झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये प्रभावीपणे उपाय योजना होत नसल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर दाखल झाल्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केवळ सात दिवसांच्या कालावधीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४७ पोहचल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र आरोग्य विभाग कोरोना संदर्भात संवेदनशिल दिसत नाही. गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रूग्णांसाठी म्हणून चार आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले. परंतु पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांना मेडिकल येथील वॉर्डात आणण्यात आले नाही. क्रीडा संकुलातच वेगळ्या कक्षात त्या रूग्णांना ठेवण्यात आले. सुरूवातीला ज्यांना-ज्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. ते सर्व मिळून-मिसळून अनेक दिवस राहीले. त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे सुध्दा पालन केले नाही. त्यांच्यातील काही लोक पॉझिटिव्ह झाल्यानंतर खळबळून जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने पॉझिटिव्ह रूग्णांना क्वारंटाईन रूग्णांपासून वेगळे केले. परंतु यातील काही क्वारंटाईन असलेल्या लोकांना सुट्टी देखील देण्यात आली. क्रीडा संकुलातील क्वारंटाईन रूग्णांमधूनच काही रुग्ण पॉझिटिव्ह येताच या ठिकाणी असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी ( सीएचओ) यांनी २३ व २४ मे रोजी बुट्टी मारली. त्या कोरोना रूग्णांची काळजी घेणारे डॉक्टर नसल्यामुळे स्वत: भेट दिलेल्या मुकाअ डॉ.राजा दयानिधी यांनी २४ मे रोजी जिल्हा शल्यचिकीत्सक कुवरतिलकसिंह सामान्य रूग्णालय गोंदिया यांच्या नावाने पत्र काढून कोरोना रूग्णांची गैरसोय झाल्याचे त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करा व याचा अहवाल २६ मे पर्यंत आपल्याला पाठवा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्या असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

डॉक्टरही असुरक्षीत
क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा म्हणून देण्यात येणारी कीट ही कोरोनाची नसून एचआयव्हीच्या संरक्षणासाठी असलेली कीट असल्याचे एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. क्रीडा संकुलातील कोविड केंद्राचे दररोज सॅनिटायझरच्या माध्यमातून स्वच्छता करणे अपेक्षीत असताना स्वच्छता होत नाही. तीन-तीन दिवस स्वच्छता कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे रूग्णांचा उपचार करताना वापरण्यात आलेले हॅण्डग्लोज कुठेही फेकून दिले जाते. कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून जी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या त्या सूचनांचे इथे कुणीच पालन करीत नसल्याचे चित्र आहे. परिणामी अश्या धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास समुदाय आरोग्य अधिकारी तयार नसल्याची माहिती आहे.
कोरोना रूग्णांचा भार कंत्राटीवर
जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये सात समुदाय आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती केली. हे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी आहेत. याच बरोबर ज्या ब्रदर्स यांना ड्यूटीवर लावण्यात आले ते देखील कंत्राटी आहेत. नियमीत डॉक्टरांना या ठिकाणी ड्यूटीवर लावण्यास जिल्हा शल्यचिकीत्सक किंवा वैद्यकीय अधिष्ठाता हे मागे का पाहतात. कोविडमध्ये काम करण्यास मनाई करणाºया नियमीत डॉक्टरांना घरचा रस्ता किंवा त्यांची नोंदणी रद्द करण्यापर्यंतचे धाडस जिल्हा प्रशासन का दाखवित नाही. देशभरात डॉक्टर देवदूत म्हणून कोविड रूग्णांची सेवा करीत आहे. मात्र गोंदियात याबाबत थोडा विरोधाभास दिसून येत आहे.

Web Title: The administration says; Inconvenience to Hotey Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.