शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता सलमान खान ९ फेब्रुवारीला गोंदियात

By admin | Updated: February 6, 2016 01:47 IST

गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणारा प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान येत्या ९ फेब्रुवारीला गोंदियात येणार आहे.

मनोहरभाई जयंती : विद्यार्थ्यांचा सत्कारगोंदिया : गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणारा प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान येत्या ९ फेब्रुवारीला गोंदियात येणार आहे. यावेळी तो आयुष्यातील आव्हाने व संकटांशी लढण्याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्याच्या हस्ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी खा.पटेल यांनीच सलमानला गोंदियात आणले होते.गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा व्यापक करणारे शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारीला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर दुपारी १२.३० वाजता आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, मिडीया गुरू सुहेल सेठ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील. गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समिती तथा मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. गेल्यावर्षी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकरच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याना गौरवित केले होते तर त्याआधी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाला होता.या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन, माजी आ.हरिहरभाई पटेल यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)